शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

तिघा अधिकार्‍यांच्या केल्या बदल्या

By admin | Updated: June 5, 2014 00:41 IST

जिल्हा परिषद : तीन विभागांचा कार्यभार प्रभारींकडे

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाली आहे. त्यामुळे ही पदे रिक्त झाली असून, त्यांचा कारभार आता प्रभारी पाहात आहेत. रिक्त झालेली पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासन खिळखिळे करण्याचा शासनाचा डाव आहे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल. एस. बागुल यांची दोन महिन्यांपूर्वीच जळगाव जिल्हा परिषद येथे बदली झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोडण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर १ जून रोजी जळगावसाठी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी अनिलकुमार कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर झाली होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांना त्यावेळी कार्यमुक्त न केल्याने ते मंगळवारपर्यंत जिल्हा परिषदेत कार्यरत होते. आता त्यांनी स्वत:च्या प्रयत्नाने हिंगोली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली फिरवून घेतली. जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोज वेताळ यांची बदली मिरज येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी झाली आहे. या तिन्ही अधिकार्‍यांना प्रशासनाने नुकतेच कार्यमुक्त केले. जिल्हा कृषी विकास अधिकारी या पदावर पुणे येथील आयुक्त कार्यालयातील उपसंचालक पी. एन. देशमुख यांची बदली झाली आहे. ते अद्याप रुजू झालेले नाहीत. शिक्षणाधिकारी आणि महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अजून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पदांचा कार्यभार प्रभारींकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची ही प्रमुख पदे किती दिवस रिक्त राहणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)