Ratnagiri: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:07 IST2024-06-14T12:06:32+5:302024-06-14T12:07:51+5:30

घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Traffic stopped due to landslide in Anuskura Ghat | Ratnagiri: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

Ratnagiri: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

राजापूर (जि. रत्नागिरी) : राजापुरात काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी सकाळपर्यंत बंद करण्यात आला आहे. 

कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा हा सर्वांत जवळचा घाट आहे. पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने भविष्यात या घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने ही दरड हटवण्यासाठी तातडीने घटनास्थळी एक जेसीबी पाठवला आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Traffic stopped due to landslide in Anuskura Ghat