रत्नागिरीतील भंडारपुळे येथे पर्यटकाचा बुडून मृत्यू

By अरुण आडिवरेकर | Updated: March 28, 2023 15:30 IST2023-03-28T15:30:04+5:302023-03-28T15:30:29+5:30

पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.

Tourist drowned at Bhandarpule in Ratnagiri | रत्नागिरीतील भंडारपुळे येथे पर्यटकाचा बुडून मृत्यू

रत्नागिरीतील भंडारपुळे येथे पर्यटकाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : फिरण्यासाठी आलेल्या नवीन पनवेल येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारपुळे (ता. रत्नागिरी) समुद्रकिनारी घडली. सागर देवदास शिर्के (३३, रा. बालाजी टाॅवरजवळ, नवीन पनवेल, रायगड) असे तरुणाचे नाव असून, ही घटना २७ मार्च राेजी सकाळी घडली.

सागर शिर्के हा साेमवारी सकाळी ८:३० वाजता आरे-वारे सागरी महामार्गावरील भंडारपुळे येथील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला हाेता. यावेळी समुद्राच्या पाण्यात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. 

ही बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घाेषित केले. याबाबत जयगड पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.

Web Title: Tourist drowned at Bhandarpule in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.