शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विधानपरिषदेसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:51 PM

रत्नागिरी : महाराष्ट्र विधानपरिषद रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ९४० मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. या निवडणुकीत राष्टÑवादीचे अनिकेत तटकरे व शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात थेट लढत होत आहे.जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती तसेच नगर परिषदांचे नगरसेवक या निवडणुकीसाठी मतदान करणार ...

रत्नागिरी : महाराष्ट्र विधानपरिषद रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ९४० मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. या निवडणुकीत राष्टÑवादीचे अनिकेत तटकरे व शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात थेट लढत होत आहे.जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती तसेच नगर परिषदांचे नगरसेवक या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. यासाठी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील मिळून एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या तीनही जिल्ह्यांतील उपविभागीय कार्यालयात मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे.त्यानुसार रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक ४६९, सिंधुदुर्गमधील २१२ व रत्नागिरीतील २५९ मतदार येत्या २१ रोजी हक्क बजाविणार आहेत. मतदान २१ मे २०१८ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत घेण्यात येईल. मतमोजणी २४ मे २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत कार्यालयात तीनही जिल्ह्यांसाठी एकत्रित होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी पूर्ण झाली आहे.मतपत्रिकेद्वारे मतदानमतदान मतपत्रिकेद्वारे होणार असून, प्रत्येक केंद्रावर एक मतपेटी राखीव ठेवण्यात येणार आहे. २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात तीनही जिल्ह्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर एकत्रित मतमोजणी होणार आहे.मतदान केंद्र (प्रांत कार्यालये, १६) : रत्नागिरी (५) - दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर. सिंधुदुर्ग (३) - कणकवली, कुडाळ, सावंतवाडी. रायगड (८) - पनवेल, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाडतीन जिल्ह्यांत मतदारमहाराष्ट्र विधानपरिषद रायगड - तथा - रत्नागिरी तथा -सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी या तीन जिल्ह्यांतील एकूण ९४० मतदार मतदानासाठी पात्र आहेत. पैकी रत्नागिरीचे २५९, सिंधुदुर्गातील २१२ आणि रायगडचे ४६९ मतदार आहेत.जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक मतदाररायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे एकूण १६४ सदस्य, पंचायत समित्यांचे ३२ सदस्य व नगरसेवक ७४४ मतदान करणार आहेत.स्त्री-पुरुष मतदार संख्या (जिल्हानिहाय)जिल्हा स्त्री पुरुषरत्नागिरी १३१ १२८सिंधुदुर्ग ७२ १४०रायगड २३८ २३१एकूण ४४१ ४९९