Ratnagiri: महामार्गावर ट्रक खड्ड्यात काेसळून तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:13 IST2025-02-13T14:13:07+5:302025-02-13T14:13:53+5:30
रत्नागिरी : सिमेंटची पाेती घेऊन जात असताना ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक खड्ड्यात काेसळून झालेल्या अपघातात चालकासह तिघे गंभीर जखमी ...

Ratnagiri: महामार्गावर ट्रक खड्ड्यात काेसळून तिघे गंभीर जखमी
रत्नागिरी : सिमेंटची पाेती घेऊन जात असताना ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक खड्ड्यात काेसळून झालेल्या अपघातात चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी तालुक्यातील बावनदी घाट पुलाजवळ झाला.
चालक विनोद शर्मा (५०), कमलेश छोटुराम रावस (४२) आणि गुडिया छोटुराम रावस (४०, सर्व रा. जे. के. फाईल, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. विनाेद शर्मा हा ट्रक (एमएच ०९, बीसी ५९४१) मधून सिमेंटची पोती घेऊन रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने चालला होता.
महामार्गावरील बावनदी घाट पुलाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात १० ते १५ फूट खाली कोसळला. या अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून, चालक विनोद शर्मा याच्यासह कमलेश छोटुराम रावस, गुडिया छोटुराम रावस हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकातील पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नाेंद ग्रामीण पाेलिस स्थानकात करण्यात आली असून, पुढील कारवाई ग्रामीण पोलिस करत आहेत.