शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटात गाडी अडवून तिघांना मारहाण, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्षांसह दहाजणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:39 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात खेडकडे जाणाऱ्या एका कारला अडवून त्यातील तिघांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात खेडकडे जाणाऱ्या एका कारला अडवून त्यातील तिघांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह १० जणांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पाेलिसांनी तिघांना अटक केली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह याच्यासह शाहिद सरगुरोह, फैजल मेमन, मोईन पेचकर, महमद खान, फहद खान, निहाल अलवारे, हनिफ रुमाने, मुजफर इनामदार, शडियाज दळवी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद मुनावर अहमद बोट (वय ४२, रा. मेटे माेहल्ला असगणी, खेड) यांनी दिली आहे.मारहाणीत बोट यांच्यासह उस्मान इसप्न झगडे, महमद अली (दोघे, रा. असगणी) हे जखमी झाले आहेत. ५ डिसेंबर रोजी रात्री ९:४५ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मेटे-मोहल्ला येथे जर्मिला शहा यांचा मुलगा तारीक याचा वाद झाल्याने त्याची माहिती जसिता यांनी त्याचा भाऊ साजिद याला दिली. या पार्श्वभूमीवर चिपळूणहून साजिद सरगुरोह याच्यासह शाहिद सरगुरोह हे तिथे गेले असता त्या ठिकाणी पुन्हा वाद झाला. त्यानुसार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुनाबर बोट यांच्यासह उस्मान नई व महमद जाली हे ६ रोजी चिपळूण येथे आले होते. मात्र, वाद न मिटल्याने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा कारने खेडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी साजिदसह दहाजण मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात थांबले हाेते. त्यांनी कार थांबवून मुनावर बोट, उस्मान झगडे, महमद अली यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये तिघांना दुखापत झाली. त्याचबरोबरच कारच्या दोन्ही बाजूच्या काचाही फोडल्या. याप्रकरणी पाेलिसांनी निहाल, शाहबाज, मुजफर या तिघांना अटक केले आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेसPoliceपोलिस