शिवजयंतीदिनी धावले हजाराे रत्नागिरीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 13:27 IST2023-02-20T13:26:40+5:302023-02-20T13:27:11+5:30
पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीदिनी आयाेजित केलेल्या फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथाॅन २०२३चे.

शिवजयंतीदिनी धावले हजाराे रत्नागिरीकर
रत्नागिरी : पहाटेची थंडी, तरीही पहाटे ५ वाजता रत्नागिरीकर एकत्र आले, प्रत्येकाला ठरलेले अंतर पार करायचे हाेते, जय-पराजयाची चिंताच नव्हती, केवळ तंदुरुस्त राहण्यासाठी धावायचे हाेते. मंंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविताच १ हजार ५५५ जणांनी धाव घेतली. हे सारे वातावरण हाेते पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीदिनी आयाेजित केलेल्या फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथाॅन २०२३चे.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री उदय सामंत व उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दरवर्षी शिवजयंतीला सर्व रत्नागिरीकर पहाटे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर असतील असे नियाेजन करा. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात एका क्रीडा प्रकाराची स्पर्धा यापुढे आयोजित केली जाईल. माणसामधील खिलाडू वृत्ती जागरूक ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. यामुळे हार पचविण्याची आणि विजयानंतर उन्माद न बाळगण्याची मानसिकता तयार होते. - उदय सामंत, पालकमंत्री.
मॅरेथॉनमध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये १ हजार ५५५ जणांनी नोंदणी केल्याने हा मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. विजेतेपद मिळविण्यापेक्षा स्पर्धेतील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या सहभागातून आनंद मिळावा, याकरिता या मॅरेथॉनचे नाव ‘हॅप्पी मॅरेथॉन’ ठेवण्यात आले. - एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी.
विजेत्यांची नावे (पहिले तीन क्रमांक)
२१ कि. मी. महिला- प्रमिला पांडुरंग पाटील, शिल्पा केंबळे, योगिता तांबडकर.
पुरुष- सिद्धेश बर्जे, ओंकार बैकर, समाधान पुकळे.
१० कि. मी. महिला- साक्षी संजय जड्याळ, प्रिया करंबेळे, शमिका मणचेकर.
पुरुष- स्वराज संदीप जोशी, अमेय धुळप, ओंकार चांदिवडे.
५ कि. मी. महिला- श्रुती दुर्गवळे, अमिता कुडकर, सिद्धी इंगवले.
पुरुष- प्रथमेश चिले, ऋतुराज घाणेकर, नितेश मायंगडे.
अठरा वर्षाखालील मुली- रिया स्वरूप पाडळकर, सांची कांबळे, आर्ची नलावडे, राखी थोरे. मुले- अथर्व चव्हाण, श्रेयस ओकटे, सुशांत आगरे, सौरभ घाणेकर.
चौदा वर्षाखालील मुली : अनुजा पवार, हुमेरा सय्यद, कार्तिकी भुरवणे.
मुले- साईप्रसाद वराडकर, वीर मेटकर, ओम भोरे.
दिव्यांग गट- सादिक नाकाडे