Ratnagiri: देवी करंजेश्वरी देवस्थानच्या पालख्यांनी ४४ शेरणे शोधली!, गोवळकोट येथे मिरवणुकीने शिमगोत्सवाची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:48 IST2026-03-04T13:47:58+5:302026-03-04T13:48:55+5:30

यानंतर मशीद भेटचा अनोखा कार्यक्रम झाला. चौघुले कुटुंबीयांतर्फे मानाची आरती स्वीकारून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली.

The Sherne program of the famous Gowalkot Pethmap Majarekashi temples, Shri Dev Someshwar and Shri Devi Karanjeshwari was held with enthusiasm in the city of Konkan | Ratnagiri: देवी करंजेश्वरी देवस्थानच्या पालख्यांनी ४४ शेरणे शोधली!, गोवळकोट येथे मिरवणुकीने शिमगोत्सवाची सांगता

Ratnagiri: देवी करंजेश्वरी देवस्थानच्या पालख्यांनी ४४ शेरणे शोधली!, गोवळकोट येथे मिरवणुकीने शिमगोत्सवाची सांगता

चिपळूण : संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या शहरातील गोवळकोट-पेठमाप-मजरेकाशीचे देवस्थान श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचा शेरणे कार्यक्रम सोमवारी सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या काठावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी देवीने १२३ पैकी ४४ शेरणे शोधून संबंधित भक्तांना कौल दिला आहे. गतवर्षी पुरलेल्या १३१ पैकी ३९ शेरणे शोधली होती. मंगळवारी गोवळकोट येथे मिरवणुकीने या शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली.

शहरातील गोवळकोट-पेठमाप-मजरेकाशीवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास मंगळवारपासून मंदिराभोवती पाच प्रदक्षिणाच्या रोमहर्षक कार्यक्रमाने व हजारो भाविकांच्या साक्षीने प्रारंभ झाला. त्यानंतर मंदिरापासून मशिदीपर्यंत पालखी मिरवणूक देऊळवाडी, सहाणवाडी, हरवडेवाडी येथील भाविकांच्या आरत्या स्वीकारत काढण्यात आली. यानंतर मशीद भेटचा अनोखा कार्यक्रम झाला. चौघुले कुटुंबीयांतर्फे मानाची आरती स्वीकारून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली.

त्यानंतर पालखी पुन्हा मागे वळवून सहाणवाडी येथे होम लावण्यासाठी आली. श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे गोविंदगडावर श्री देवी रेडजाई देवस्थानच्या भेटीचा कार्यक्रम पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या ठिकाणी मानकरी जगताप कुटुंबीयांतर्फे पूजा झाली व त्यानंतर पालखीचे पेठमापच्या दिशेने प्रयाण झाले. पेठमापवासीयांच्या आरत्या स्वीकारल्यानंतर देवीची ओटी भरण्याचा व करमणुकीचा कार्यक्रम झाला.

सोमवारी या शिमगोत्सवातील प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम झाला. मनात नवस बोलून लपविलेल्या १२३ शेरण्यांपैकी देवीने ४४ शेरणे शोधून काढत भाविकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्याचा कौल दिला.

यावेळी झालेली अलोट गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी दोन्ही पालख्यांचे गोवळकोट येथील मंदिराकडे प्रयाण झाले. मंगळवारी (दि. ३) गोवळकोट येथे होम लावून तेथील सहाणेवर विराजमान करण्यात आली. सायंकाळी दोन्ही पालख्या मिरवणुकीने मंदिरात नेऊन शिमगोत्सवाची सांगता झाली.

शेरणे म्हणजे काय

मनात नवस बोलून शेरणे (सजवलेला नारळ) कोणाच्याही नकळत नदीकिनारी लपविला जातो. पालखी आणि निशाण तेथे फिरते. जेथे पालखी व निशाण जड लागले, तेथे उकरून पाहिले जाते. अशा ठिकाणी शेरणे सापडतात. ज्यांनी लपविलेले शेरणे पालखीला सापडते, त्यांचा नवस पूर्ण होतो, असे मानले जाते.

Web Title : रत्नागिरी: करंजेश्वरी देवी ने खोजे 44 'शेरने'; शोभायात्रा के साथ शिमगोत्सव संपन्न।

Web Summary : चिपळूण के शिमगोत्सव में करंजेश्वरी देवी ने 44 छिपे हुए 'शेरने' खोजे, भक्तों की मनोकामनाएं पूरी कीं। हिंदू-मुस्लिम एकता के प्रतीक मस्जिद भेंट जैसी अनूठी परंपराओं और शोभायात्रा के साथ गोवलकोट में देवी रेडजाई की यात्रा के बाद उत्सव संपन्न हुआ।

Web Title : Ratnagiri: Karanjeshwari Devi finds 44 'Sherne'; Shimgotsav concludes with procession.

Web Summary : Karanjeshwari Devi found 44 hidden 'Sherne' at Chiplun's Shimgotsav, fulfilling devotees' wishes. The festival, marked by processions and unique traditions like the Masjid visit symbolizing Hindu-Muslim unity, concluded with a vibrant procession at Gowalkot after Devi Redjai visit.