रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हलवणार नाही, पालकमंत्री उदय सामंतांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:37 IST2025-01-28T12:36:48+5:302025-01-28T12:37:10+5:30

रत्नागिरी : क्रिटीकल केअर युनिटच्या माध्यमातून आरोग्याचे दालन सुरु होत आहे. घराघरांत आरोग्याची सुविधा पोहोचविण्यासाठी ‘ हॉस्पिटल ऑन व्हील’ ...

The regional psychiatric hospital in Ratnagiri will not be moved, assures Guardian Minister Uday Samanta | रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हलवणार नाही, पालकमंत्री उदय सामंतांची ग्वाही 

रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हलवणार नाही, पालकमंत्री उदय सामंतांची ग्वाही 

रत्नागिरी : क्रिटीकल केअर युनिटच्या माध्यमातून आरोग्याचे दालन सुरु होत आहे. घराघरांत आरोग्याची सुविधा पोहोचविण्यासाठी ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ ही संकल्पना सुरू करणार आहे, असे आश्वासन देतानाच प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून कुठेही बाहेर जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

येथील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (पीएम अभीम) क्रिटिकल केअर युनिटच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अधिष्ठाता डॉ. रामानंद जयप्रकाश वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संघमित्रा फुले, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, आरोग्याच्या सुविधा निर्माण करताना चांगल्या इमारती हव्यात. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी सीसीयूमुळे मदत होणार आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कॅशलेस हॉस्पिटलरत्नागिरीमध्ये सुरू आहे. लवकरच ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ ही संकल्पना जिल्ह्यात आणणार असून, त्या माध्यमातून घराघरांत आरोग्याच्या सुविधा पोहोचविल्या जातील. डॉक्टरांनी रुग्णांवर हसत हसत उपचार केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रशियन महिलेच्या मानसिकतेवर उपचार करण्यात आले. घरच्यांपेक्षाही चांगले उपचार इथे आल्यावर रुग्णांवर होतात. तसेच त्या महिलेवरही करुन तिला तिच्या कुटुंबाकडे पाठविण्यात आले. एकाअर्थाने हे प्रादेशिक मनोरुग्णालय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे काम केले आहे. त्याबद्दल डॉ. फुले यांना धन्यवाद देतो, असे सांगून हे प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातच राहणार असून, ते कोणत्याही जिल्ह्यात स्थलांतरित होणार नाही, अशी ग्वाही दिली.

स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची

शासकीय कार्यालयांबरोबरच शासकीय रुग्णालये त्याचा परिसर, विशेषत: शौचालये, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, असेही मंत्री सामंत म्हणाले. २४ कोटी रुपये खर्चून क्रिटिकल केअर युनिट सुरु करणार.

Web Title: The regional psychiatric hospital in Ratnagiri will not be moved, assures Guardian Minister Uday Samanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.