शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘बाळासाहेबांचा वारसदार जनतेनेच ठरवला’; माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 06:23 IST

उद्धवसेनेचे माजी आमदार, विद्यमान जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष यांच्यासह अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.

रत्नागिरी : राज्यात शिंदेसेनेने ८० उमेदवार दिले आणि त्यातील ६० निवडून आले. उद्धवसेनेने ९७ उमेदवार दिले, त्यातील फक्त २० निवडून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार कोण आहेत, हे जनतेनेच दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उद्धवसेनेचे माजी आमदार, विद्यमान जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष यांच्यासह अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.

विधानसभेत विजयी झाल्यानंतर आपण आभार मानण्यासाठी येण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आपण आलो आहोत, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वाढीमध्ये कोकणी माणसाचाच हात मोठा असल्याचे सांगितले. म्हणूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ८ पैकी ७ जागा महायुतीला मिळाल्या आहेत, असे ते म्हणाले.

युतीचे राज्य असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. असा टोलाही त्यांनी हाणला.

लाडका भाऊ मोठा सन्मान

राजकारणात पदे वरखाली होत राहतात; पण मुख्यमंत्री म्हणून मी राबविलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातून मिळालेला ‘लाडका भाऊ’ हा सन्मान आपल्यासाठी सर्व पदांपेक्षा मोठा  आहे, असेही एकनाथ शिंदे आवर्जून म्हणाले.

दाढीच्या मागे लागू नका, मला हलक्यात घेऊ नका

दाढी म्हणून आमची चेष्टा केली जाते, पण दाढीनेच आघाडीत बिघाड केला आणि महायुतीची विकासाची गाडी पुढे नेली. मात्र, या दाढीच्या नादाला लागू नका. मी आरोपांना कामातून उत्तर देणारा माणूस आहे,  मला हलक्यात घेऊ नका, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांना सुनावले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना