चेहरा विद्रुप करुन वृद्धाचा खून, रत्नागिरीत उडाली खळबळ

By मनोज मुळ्ये | Updated: March 18, 2023 11:00 IST2023-03-18T11:00:07+5:302023-03-18T11:00:43+5:30

रत्नागिरी : चेहरा विद्रुप करुन एका वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे लावगणवाडी येथे शुक्रवारी रात्री ...

The murder of an old man by disfiguring his face in Ratnagiri | चेहरा विद्रुप करुन वृद्धाचा खून, रत्नागिरीत उडाली खळबळ

चेहरा विद्रुप करुन वृद्धाचा खून, रत्नागिरीत उडाली खळबळ

रत्नागिरी : चेहरा विद्रुप करुन एका वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे लावगणवाडी येथे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या घडला. दिलीप रामाणे असे त्यांचे नाव असून, बौद्धवाडीच्या स्मशानाजवळील आंब्याच्या बागेत त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे कोतवडे गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

दिलीप रामाणे हे गावातच मोलमजुरीचे काम करतात. शुक्रवारी दिवसभर त्यांना गावातील ग्रामस्थांनी पाहिले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता काही तरुण लावगणवाडी येथील रस्त्यावरून जात असताना बागेत त्यांना एक व्यक्ती रक्तबंबळ अवस्थेत पडलेली असल्याचे दिसून आले, परंतु त्यांचा चेहरा विद्रूप झालेला असल्याने घातपताचा संशय वाटला. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस पाटलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस पाटलांनी तत्काळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क  साधला.

दिलीप रामाणे रोज सायंकाळी काम आटोपल्यानंतर मित्रांसोबत गप्पा गोष्टी करून घरी परतत असत, परंतु शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नव्हते. कुटुंबीय त्यांची घरी वाट बघत असतानाच ते  बौद्धवाडीच्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या बागेत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याची माहिती ग्रामस्थांनी कुटुंबियांना दिली.

Web Title: The murder of an old man by disfiguring his face in Ratnagiri