रत्नागिरीतील खेडमधील खुनाचा झाला उलगडा, पत्नीशी पटत नसल्यानेच पतीने केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:30 IST2022-11-08T17:30:40+5:302022-11-08T17:30:59+5:30
दरम्यान, खुन्याचा माग काढण्यासाठी बाेलावण्यात आलेले श्वानपथकही घटनास्थळी घुटमळल्याने संशयाची सुई महिलेच्या पतीवरच होती.

रत्नागिरीतील खेडमधील खुनाचा झाला उलगडा, पत्नीशी पटत नसल्यानेच पतीने केला खून
खेड : शहरातील सन्मित्रनगर येथील झोपडपट्टीत वास्तव्यास असणाऱ्या बेबी कादर बादशाह नदाफ या ४५ वर्षीय पत्नीचा पतीनेच खून केल्याचे उघड झाले आहे. पत्नीशी पटत नसल्यानेच पतीने खून केल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कादर बादशाह नदाफ याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बेबी नदाफ या महिलेचा ३ नोव्हेंबर रोजी मृतदेह संशयास्पद आढळला हाेता. त्यानंतर घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यादृष्टीने पोलीस साऱ्या शक्यतांचा पडताळा करत होते. दरम्यान, खुन्याचा माग काढण्यासाठी बाेलावण्यात आलेले श्वानपथकही घटनास्थळी घुटमळल्याने संशयाची सुई महिलेच्या पतीवरच होती.
या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कादर बादशाह नदाफ याची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती घरगुती कारणावरून त्यानेच पत्नीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पाेलीस करत आहेत.