Ratnagiri Nagar Parishad Election Result 2025: रत्नागिरी जिल्ह्यात महायुती आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:39 IST2025-12-21T11:37:14+5:302025-12-21T11:39:39+5:30
रत्नागिरी नगर परिषदेत 32 पैकी 29 जागांवर शिंदेसेना-भाजप युतीचा विजय

Ratnagiri Nagar Parishad Election Result 2025: रत्नागिरी जिल्ह्यात महायुती आघाडीवर
रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींमधील नगरसेवकांच्या १५१ जागा आणि सात नगराध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. जिल्ह्यात शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यामधील वर्चस्वाची लढत, बंडखोरीमुळे वाढलेली अपक्षांची संख्या यामुळे निकालाची उत्सुकता शिंगेला पोहचली होती. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीनुसार शिंदे सेना आणि भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
रत्नागिरीनगर परिषदेत 32 पैकी 29 जागांवर शिंदेसेना-भाजप युतीचा विजय झाला आहे. तर केवळ तीन जागेवर उद्धव सेना विजयी झाली. राष्ट्रवादीसह काँग्रेसचे विजयाचे खातेही उघडता आले नाही. नगराध्यक्षपदावर शिंदे सेनेचाच उमेदवार विराजमान होणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमधून शिंदेसेनेचे निमेश नायर व स्मितल बावस्कर विजयी झाले आहेत. आतापर्यंत एकूण शिंदेसेनेचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. तर उद्धवसेनेचे केतन शेटे व फौजिया मुजावर प्रभाग क्रमांक चार मधून विजयी झाले आहे.
लांजा नगरपंचायतीच्या पहिल्या फेरीत शिंदे सेनेचे ६ तर उध्दवसेनेचे १ उमेदवार विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेच्या सावली कुरूप यांनी आघाडी घेतली आहे.
देवरूख नगरपंचायत निकालात महायुतीने विजयी गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. १ ते प्रभाग क्र. ९ मध्ये महायुतीने सरशी घेतली. तर दोन अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.
विजयी उमेदवार खालीलप्रमाणे
प्रभाग क्र. १. समृद्धी वेलवणकर (भाजप)
प्रभाग क्र. २. यशवंत गोपाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
प्रभाग क्र. ३. दिपक गेल्ये (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग क्र. ४. वैभव पवार (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग क्र. ५. स्वाती राजवाडे (भाजप)
प्रभाग क्र. ६. प्राची भुवड (राष्ट्रवादी अजित पवार गट))
प्रभाग क्र. ७. श्रध्दा इंदुलकर (भाजप)
प्रभाग क्र. ८. सिध्देश वेल्हाळ (अपक्ष)
प्रभाग क्र. ९. कविता नार्वेकर (अपक्ष)