पालकमंत्र्यांची यादी जाहीर ही निव्वळ अफवा : मंत्री उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 19:19 IST2025-01-06T19:18:36+5:302025-01-06T19:19:12+5:30
रत्नागिरी : पालकमंत्री जाहीर करण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच आहेत. अजूनही पालकमंत्र्यांची निवड करण्यात आलेली नसून, ...

पालकमंत्र्यांची यादी जाहीर ही निव्वळ अफवा : मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : पालकमंत्री जाहीर करण्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच आहेत. अजूनही पालकमंत्र्यांची निवड करण्यात आलेली नसून, काेणतीही यादी जाहीर झालेली नाही. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे, ही निव्वळ अफवा असल्याची प्रतिक्रिया उद्याेग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
पालकमंत्री निवडीची घाेषणा करण्यात आली असून, त्यांची यादी प्रसिद्ध झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर शनिवारी फिरत हाेता. या यादीमध्ये रत्नागिरीच्या पालकमंत्रिपदी उदय सामंत यांची निवड करण्यात आली असून, गृहराज्यमंत्री याेगेश कदम यांच्यावर मुंबई शहराची जबाबदारी देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याचबराेबर अन्य जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांचीही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
या यादीबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पालकमंत्री जाहीर करण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना आहेत. पालकमंत्री पदाची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही निव्वळ अफवा असून, काेणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सामंत यांनी सांगितले.
शुभेच्छांचे मेसेज
यादी जाहीर झाल्याचा मेसेज साेशल मीडियावर सर्वत्र फिरताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. साेशल मीडियावर अनेकांनी मंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाच्या पाेस्ट टाकल्या हाेत्या.