Ratnagiri: सर्पदंशाने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू, पावस येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:56 IST2024-09-26T15:56:19+5:302024-09-26T15:56:43+5:30
रत्नागिरी : घरात झोपलेल्या दहा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पावस येथील नळीवाडी-चांदोर (ता. रत्नागिरी ) येथे ...

Ratnagiri: सर्पदंशाने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू, पावस येथील घटना
रत्नागिरी : घरात झोपलेल्या दहा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पावस येथील नळीवाडी-चांदोर (ता. रत्नागिरी) येथे सोमवारी घडली. केतकी महादेव बारमोडे असे तिचे नाव आहे.
केतकी घरात झाेपलेली असताना तिच्या उजव्या हाताच्या दंडावर काहीतरी टाेचल्यासारखे झाले. त्यानंतर ती माेठ्याने ओरडली. तिच्या ओरडण्याने घरातील मंडळी जागे झाले. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता जवळ सर्प असल्याचे त्यांनी पाहिले. या सर्पाविषयी खात्री केली असता ताे कांडर जातीचा असल्याचे लक्षात आले. तिच्या पालकांनी शेजारील लाेकांना व नातेवाईकांना बाेलावून घेतले. त्यानंतर केतकीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच साेमवारी सकाळी तिचा दुर्दैवानं मृत्यू झाला.
याप्रकरणी पूर्णगड सागरी पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर बारमोडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर काेसळला आहे.