शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Ratnagiri: ब्रेक निकामी झाला, टेम्पो थेट गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू

By अरुण आडिवरेकर | Published: September 29, 2023 4:59 PM

पाच जण जखमी

गुहागर : ब्रेक निकामी झालेला टेम्पो गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाचेरी आगर भुवडवाडी (ता. गुहागर) येथे गुरूवारी (दि.२८) सायंकाळी घडली. गाडी चालक दीपक लक्ष्मण भुवड (५०) आणि काेमल नारायण भुवड (१७) असे दाेघांची नावे असून, पाच जण जखमी झाले आहेत.पाचेरी आगर भुवडवाडी येथील गणपती विसर्जनासाठी गुरुवारी सायंकाळी ब्राह्मणवाडी फाटा येथील पुढील पाण्याच्या भागात नेले जातात. हे अंतर भुवडवाडीपासून अर्धा किलोमीटर असून, तीव्र उताराचे आहे. या उतारातून मिरवणूक जात असताना मिरवणुकीमधील २०७ जीप गाडीचे ब्रेक निकामी झाले आणि गाडी विसर्जनातील ग्रामस्थ व महिलांच्या अंगावर गेली. कोणाला काही समजण्याच्या आतच गाडीचे मालक चालक दीपक लक्ष्मण भुवड यांच्यासह कोमल नारायण भुवड यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात दिया रमेश भुवड (१६) व तेजल संदीप पाष्टे (२०), रिया रामचंद्र वेलोंडे (१२), स्नेहल संदीप पाष्टे (२३) आणि उषा गुणाजी पाष्टे (५६) जखमी झाले आहेत. सर्वांना आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.अपघाताचे वृत्त कळताच गुहागरचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पाेलिस अधिकारी राजेंद्र राजमानेही घटनास्थळी दाखल झाले हाेते. पाेलिसांनी तातडीने मदत कार्य करुन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद गुहागर पाेलिस स्थानकात करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातGanesh Mahotsavगणेशोत्सवDeathमृत्यू