शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची शाबासकी महत्वाची वाटते

By admin | Updated: January 1, 2015 00:16 IST

सदानंद चव्हाण : मान्यवरांचा गौरव, शिक्षक समितीतर्फे प्रकाशन समारंभ

चिपळूण : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी चांगली पावले उचलली आहेत. आपण याबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली असून, सभागृहातही आवाज उठविला आहे. सर्व शिक्षक संघटनांनी आपल्या समस्यांसाठी एकत्र प्रयत्न केले तर ते प्रभावी होतील. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतच असतो. पण शिक्षकांनी कौतुकाची पाठीवर मारलेली थाप त्यांच्यासाठी महत्त्वाची असते, असे प्रतिपादन आमदार सदानंद चव्हाण यांनी केले.चिपळूण येथील पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा, चिपळूणतर्फे रविवारी सकाळी दिनदर्शिका प्रकाशन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ झाला. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार पंडित होते. आमदार चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, महिला बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, पंचायत समिती सभापती समीक्षा बागवे, उपसभापती सुचिता सुवार, समितीचे जिल्हा सचिव दिलीप महाडिक, कार्याध्यक्ष प्रभाकर खानविलकर, कोषाध्यक्ष अरविंद जाधव, शिक्षण समिती सदस्य सुनील दळवी, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश काजवे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा सदस्य जयरत्न कदम, पतपेढी संचालक विनय घाणेकर, पंचायत समिती सदस्य दीपक वारोसे, सुभाष कदम, शांताराम बागवे उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष मनोज म्हस्के यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याचा आढावा घेतला. सरचिटणीस मिलिंद चव्हाण, कार्याध्यक्ष विलास गमरे, कोषाध्यक्ष अरविंद राणे, उपाध्यक्ष संतोष कदम, समितीचे नेते संतोष सुर्वे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत तसेच दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जगदीश कांबळे, शिक्षण समिती सदस्य सुनील दळवी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)