सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 17:13 IST2019-11-03T17:12:28+5:302019-11-03T17:13:05+5:30

सरकार स्थापनेचा विषय सुरूच राहील. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतीलच.

Talk about government later, first farmers question is important - Aditya Thackeray | सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे 

सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे 

रत्नागिरी - सरकार स्थापनेचा विषय सुरूच राहील. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतीलच. सध्या महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या नुकसानीचा. त्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांना भेटून माहिती घेत आहोत, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

क्यार वादळामुळे आलेल्या पावसाने कोकणातील भातशेतीला मोठ्या प्रमाणात दणका दिला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी रविवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे रविवारी सकाळी रत्नागिरीत दाखल झाले. त्यांनी प्रथम लांजा तालुक्यातील कुवे येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

लांजा तालुक्यातील पाहणीनंतर ते राजापूर तालुक्यात गेले. तेथे उपळे येथे पाहणी केली. येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी राज्यपालांनाही भेटलो आहोत. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न देता जास्त भरपाई कशी देता येईल याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. सरकार स्थापनेबाबात ते म्हणाले की, राजकारण सुरूच राहिल. पण आता शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटण्याला प्राधान्य दिले आहे.

Web Title: Talk about government later, first farmers question is important - Aditya Thackeray