शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

दापोली : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र ...

दापोली : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे़ सुमारे ८,५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून ती दापोलीत दाखल झाली हाेती.

प्रणालीने अवघ्या २१ वर्षात समाजकार्यातील पदवी मिळवली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई व वडील शेती करतात. तिला दोन बहिणीही आहेत. प्रणालीने दापोलीमधील कुडावळे येथे दिलीप कुलकर्णी आणि डॉ. पौर्णिमा कुलकर्णी यांच्याकडे काही दिवस वास्तव्य करून निसर्गस्नेही जीवनशैलीबद्दल जाणून घेतले. पर्यावरणीय सजगता बाळगून दैनंदिन जीवनात खूप मोठी तडजोड न करता कसं छान जगता येतं, हे प्रणाली येथे शिकली. भोगवादी जीवनशैलीचा त्याग करून, संयमित, निरामय, पर्यावरणपूरक अशी जीवनशैली जगणारे कुटुंब विक्रांत आणि मोहिनी पाटील यांनीही तिचा पाहुणचार केला.

प्रणाली काही दिवस चिखलगाव येथील दांडेकर परिवाराकडे पाहुणचार घेत लोकसाधना प्रकल्पाचा अभ्यास करणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वांगीण ग्रामविकास या पाच क्षेत्रात लोकसाधना आज काम करत आहे. त्यामुळे येथे खूप काही नवीन शिकायला मिळेल असा विश्वास प्रणालीने बोलून दाखविला.

सायकलने प्रवास करीत प्रणाली नागरिकांशी संवाद साधते. स्थानिक संस्था, शाळा, सरकारी यंत्रणांना भेटी देऊन जनजागृती करते व माहिती पोचवते. त्या-त्या भागातील माहिती घेते, चर्चा करते. आरोग्य जनजागृती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवा हा संदेश देते. स्थानिक पर्यावरणाबाबत महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करते. जल, जंगल, जमीन या विषयावर काम करणाऱ्या व्यक्तींकडून त्यांची भूमिका जाणून घेते. सध्या कोरोना लॉकडाऊन लागल्यामुळे यामध्ये काही प्रमाणात निर्बंध आले आहेत. प्रवास थांबत थांबत सुरू आहे. या वेळेचा सदुपयोग तिने वाचन, लेखन, अभ्यास यासाठी केला आहे. कोकणातील आंबे, काजू, करवंद, जांभूळ, कलिंगड, फणस, कोकम, जाम आदी फळांचा पण मनमुराद स्वाद घेत आहे.

------------------------------

स्वजबाबदारीवर प्रवास

प्रणालीचा सायकल प्रवास हा व्यक्तिगत स्वजबाबदारीचा आहे. ती सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे पैसे घेऊन निघाली नाही. स्वतः कमीत कमी गरजांमध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहे. सोबत आर्थिक व वस्तूरूपातील मदतसुध्दा लोकच करतात. या सात महिन्यांत अनेक सुखद अनुभव आले आहेत, असे प्रणालीने सांगितले.