Ratnagiri: तोणदेतील शंकराच्या स्वयंभू सांब मंदिराला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा

By अरुण आडिवरेकर | Updated: July 27, 2023 18:18 IST2023-07-27T18:11:27+5:302023-07-27T18:18:15+5:30

काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ

Swayambhu Samba temple of Shankara in Tonde again surrounded by flood water | Ratnagiri: तोणदेतील शंकराच्या स्वयंभू सांब मंदिराला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा

Ratnagiri: तोणदेतील शंकराच्या स्वयंभू सांब मंदिराला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जाेर कायम असून, मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले असून, ताेणदे (ता. रत्नागिरी) गावातील शंकराच्या स्वयंभू श्री सांब मंदिराला पुराच्या पाण्याचा पुन्हा वेढा पडला आहे.

जिल्ह्यात मंगळवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून, नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये पसरले आहे. त्यामुळे शेती जलमय झाली आहे.

ताेणदे गावात शंकराचे पुरातन स्वयंभू सांब मंदिर आहे. हे मंदिर काजळी नदीकिनारी वसलेले आहे. या मंदिराला काजळी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. मंदिराच्या सभाेवताली पुराचे पाणी साचल्याने मंदिरात जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. हाेडीच्या आधारे या भागातील ग्रामस्थ मंदिरात ये-जा करतात. गतवर्षी श्रावणात हरिनाम सप्ताहाच्या काळात मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला हाेता. त्यावेळी ग्रामस्थांनी हाेडीतून जाऊन मंदिरात हरिनाम सप्ताह साजरा केला हाेता.

Web Title: Swayambhu Samba temple of Shankara in Tonde again surrounded by flood water