जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या बदलीची अफवा पसरवणारा संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 07:02 AM2021-05-04T07:02:38+5:302021-05-04T07:03:01+5:30

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली झाल्याचे एक पत्र रविवारी सोशल मीडियावर फिरत होते.

Suspect arrested for spreading rumors of Collector Mishra's transfer | जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या बदलीची अफवा पसरवणारा संशयित ताब्यात

जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या बदलीची अफवा पसरवणारा संशयित ताब्यात

Next

रत्नागिरी: जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीची अफवा पसरवल्याप्रकरणी रत्नागिरीपोलिसांनी २४ तासात एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे. रत्नागिरीच्या  स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली झाल्याचे एक पत्र रविवारी सोशल मीडियावर फिरत होते. त्यावरुन जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आपली बदली झालेली नसल्याचे  जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. रत्नागिरीतून कोरोना जात नाही तोपर्यंत मी रत्नागिरीसाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बदलीचे हे पत्र नेमके कोणी तयार केले, कसे तयार केले याचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २४ तासात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची माहिती मंगळवारी पुढे येईल अशी अपेक्षा केली जात आहे.

Web Title: Suspect arrested for spreading rumors of Collector Mishra's transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.