खासगी प्रवासी बसला अचानक आग; सर्व प्रवासी सुखरूप

By मनोज मुळ्ये | Updated: May 1, 2024 17:27 IST2024-05-01T17:26:03+5:302024-05-01T17:27:04+5:30

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे (ता. संगमेश्वर) येथे रत्नागिरीला येणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली.

sudden fire in a private passenger bus in ratnagiri all passengers safe | खासगी प्रवासी बसला अचानक आग; सर्व प्रवासी सुखरूप

खासगी प्रवासी बसला अचानक आग; सर्व प्रवासी सुखरूप

मनोज मुळ्ये, रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे (ता. संगमेश्वर) येथे रत्नागिरीला येणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. आगीचे कारण समजले नाही. मात्र प्रवासी सुखरूप आहेत. आग लागल्याचे समजल्यानंतर संगमेश्वर पोलिस स्थानकाचे सचिन कामेरकर, प्रशांत शिंदे आव्हाड आणि कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यास मदत केली. 

कैस मालगुंडकर यांनी म्हात्रे कंपनीचा पाण्याचा टॅकर तत्काळ पाठविल्याने आग आटोक्यात आली गाडीचे नुकसान फार झाले नाही. एसी कॉईल गरम झाल्याने किरकोळ आग लागल्याचे या कंपनीकडून सांगण्यात आले असून, बस, सामान अथवा प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: sudden fire in a private passenger bus in ratnagiri all passengers safe