शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

Ratnagiri News: पहिल्याच दिवशी भर पावसात विद्यार्थी शाळेबाहेर, रायपाटण गावातील दुर्दशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 16:24 IST

राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. परंतु रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील दुर्दशा समोर आली आहे.

राजापूर : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. परंतु रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस फारसा चांगला नव्हता. शाळेच्या पहिल्याच दिवशी जमीन मालकाने विद्यार्थ्यांचा मार्ग अडवून धरला. शाळेच्या जमिनीवर जमीन मालकाने दावा केल्याने विद्यार्थ्यांना भरपावसात शाळेबाहेरचं उभे राहावं लागलं.बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. प्रवेशद्वार फुगे, फुलांनी सजवलले होते. लेझीम, ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना वही पेन देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता. या चिमुकल्यांचे रडणे, शिक्षकांचं समजावणं, मुलांचा किलबिलाट यामुळे शाळा दोन वर्षांनंतर गजबजून गेल्याचं दिसून आलं. मात्र, रायपाटण येथे मुलांना शाळेतच जाता आले नाही.राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या रायपाटण गावात हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषदेची शाळा माझ्या जागेत आहे. मी कुणाला जाऊ देणार नाही, असं म्हणत संबंधित जमीन मालकाने कुंपण देखील घातलं आहे. शाळेच्या जमिनीवर जमीन मालकाने दावा केल्याने विदयार्थी भर पावसात शाळेबाहेर उभं राहावं लागलं आहे.

शाळेच्या नूतनीकरणाबाबत याच मालकाने आडकाठी केल्याने २०१९ पासून हे प्रकरण दिवाणी न्यायालयात गेलं आहे. पण असं असलं तरी शाळेच्या इमारतीचा सात बारा जिल्हा परिषदेच्या नावावर आहे, अशी माहिती तंटामुक्ती अध्यक्षाने दिली आहे. या सगळ्या गोंधळात गटशिक्षण आणि इतर अधिकारी गावात दाखल झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाStudentविद्यार्थीRainपाऊस