शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

फळझाड लागवड योजना सुरु

By admin | Updated: August 27, 2015 23:39 IST

शेतकऱ्यांना दिलासा : शासनाने मान्यता दिल्याने समाधान

शिवाजी गोरे -दापोली आघाडी सरकारच्या काळात बंद झालेली रोजगार हमी फळझाड लागवड योजना नव्या सरकारने पुन्हा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवडीद्वारे फळविकासाची योजना सन २०१५-१६ मध्ये पुढे चालू ठेवण्याची शासनाने मान्यता दिल्याने फळझाड लागवड शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कारकिर्दीत राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत फळझाड लागवड योजना राबवण्यात आली होती. अगदी सुरुवातीच्या काळात या योजनेला शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. परंतु त्यानंतर मात्र राज्याचा लक्षांक कमी करण्यात आला. गेल्या दोन वर्षात तर या योजनेकडे सरकारने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे २०१४ मध्ये ही योजनाच बंद होती. परंतु या योजनेला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून महायुतीच्या सरकारने योजना पुन्हा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५-१६ या वर्षाकरिता सात हजार हेक्टर क्षेत्रावर फळझाड लागवडीचे उद्दिष्ट राज्याला घालून दिले आहे.महाराष्ट्रात फळवृक्ष लागवडीला भरपूर वाव आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्याची आर्थिक प्रगती व पडीक जमिनीचा विकास या हेतूने रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवड कार्यक्रम सन २०१५-१६ या चालू वर्षात राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली कलमे, रोपे शासकीय रोपवाटिका, कृषी विद्यापीठ रोपवाटिका, शेती महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र व राज्यातील खासगी नोंदणीकृत रोपवाटिका यांच्याकडून उपलब्ध करुन घ्यावयाची आहेत. लवकरच संचालक (फलोत्पादन) कृषी आयुक्तालय सर्व संबंधितांना रोपाचे नियोजन व वितरणाचे आदेश निर्गमित करतील, असे सांगण्यात आले.जिल्हानिहाय लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी संचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्तालय सर्व संबंधितांना रोपाचे नियोजन व वितरण आदेश निर्गमित करतील, असेही सांगण्यात आले. जिल्हानिहाय लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी संचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, पुणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.फळझाड लागवड योजना योग्य रितीने राबवण्यासाठी कालबद्ध वेळापत्रकानुसार कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण विभागासाठी ३० सप्टेंबर, उर्वरित विभागासाठी ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत लागवड करण्यात यावी, अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत.अनुदानप्राप्त लागवडकोरडवाहू पिके - आंबा, काजू, बोर, सीताफळ, आवडाळ, चिंच, फणस, कोकम, जांभूळ, कवठ, चारोळी, जौजोबा, बांबू. बागायती पिके - नारळ, संत्रा, मोसंबी, चिकू, डाळींब, पेरु, अंजीर, कागदी लिंबू, सुपारी, तेलताड, रबर. औषधी व सुगंधी वनस्पती - आईनर, अर्जुन, असन, अशोका बेल गुग्गुळ, लोध्रा, रक्तचंदन, शिवण, टेटू, बेहडा, बिब्बा, डिकेमाली, हिरडा, रिठा, वावडिंग, करंज, पानपिपरी. मसाला पिके - मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी.