मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळ एसटी-मिनीबसची टक्कर, 12 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 13:40 IST2017-10-23T13:38:59+5:302017-10-23T13:40:15+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी सकाळी खासगी मिनी बस आणि एसटी बसची समोरासमोर जोरदार टक्कर झाली.

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळ एसटी-मिनीबसची टक्कर, 12 जखमी
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी सकाळी खासगी मिनी बस आणि एसटी बसची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. मिनी बस चालकाची प्रकृती गंभीर आहे.
सर्व जखमींना संगमेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरी-चिपळूण एसटी बसला अपघात झाला. संगमेश्वरच्या ओझरखोल येथे हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.