Ratnagiri: चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटली, आंबडवे ते लोणंद राष्ट्रीय महामार्गावर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 11:54 IST2023-08-08T11:54:28+5:302023-08-08T11:54:59+5:30
अपघाताची माहिती मिळताच एसटी प्रशासन घटनास्थळी दाखल

Ratnagiri: चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटली, आंबडवे ते लोणंद राष्ट्रीय महामार्गावर अपघात
मंडणगड : चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटल्याने वाहकासह काही प्रवाशी जखमी झाले. आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज, मंगळवार (दि.८) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, आंबडवे होऊन नालासोपाराकडे जाणाऱ्या एसटी बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्यालगत उलटली. बसमध्ये दहा ते बारा प्रवासी होते. सुदैवाने अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच एसटी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.