पावसाने निरोप घेतल्याने महामार्ग कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:54 PM2020-10-10T13:54:55+5:302020-10-10T13:57:12+5:30

highway, rain, konkanroad, pwd, ratnagirinews पावसाचा जोर कमी होताच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. कशेडी ते परशुराम या टप्प्यातील ४४ किलोमीटर रस्त्याचे काम मे २०२० अखेर पूर्ण करण्यासाठी कंपनीने कामाला गती दिली आहे.

Speed up highway work as rain bids farewell | पावसाने निरोप घेतल्याने महामार्ग कामाला गती

पावसाने निरोप घेतल्याने महामार्ग कामाला गती

Next
ठळक मुद्देपावसाने निरोप घेतल्याने महामार्ग कामाला गतीपुन्हा एकदा चौपदरीकरणाच्या कामाला गती

खेड : पावसाचा जोर कमी होताच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. कशेडी ते परशुराम या टप्प्यातील ४४ किलोमीटर रस्त्याचे काम मे २०२० अखेर पूर्ण करण्यासाठी कंपनीने कामाला गती दिली आहे.

लॉकडाऊन आणि त्यानंतर सुरु झालेला पाऊस यामुळे कामाला ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. वेरळ खोपी-फाटा येथील रेल्वे ट्रॅकवरील पूल बांधणीच्या कामालाही युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.

मुंबई - गोवा महामार्गाच्या कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटरच्या कामाचा ठेका कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतला आहे. सद्यस्थितीत सुमारे ३० किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पूल किंवा मोऱ्या बांधणे आवश्यक आहे, त्या ठिकाणचे काम थांबले होते. मात्र, आता ते कामही हाती घेण्यात आले आहे.

चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीसमोर आव्हान होते ते ४ किलोमीटरच्या भोस्ते घाटाचे. पावसाळ्यात तर हा घाट अधिकच धोकादायक होतो. मात्र, आता या घाटातील भीती संपली आहे. पूर्ण घाट मार्ग वाहतुकीस खुला झाला असल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. गेली दोन वर्षे रखडलेले भरणे नाका येथे महामार्गाचे कामही आता वेगाने सुरू झाले आहे.

Web Title: Speed up highway work as rain bids farewell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.