शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime News: आई म्हणाली, मसाला तयार कर; मुलाने डोक्यात घातला वरवंटा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:37 IST

घाबरला अन् पाेलिसांकडे धावला, पाेलिसांनी तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले

लांजा : ‘कोळंबीसाठी मसाला तयार कर,’ सांगितल्याचा राग आल्याने मुलाने वयोवृद्ध आईच्या डोक्यात वरवंटा घातल्याची घटना लांजातील धावणेवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून, पाेलिसांनी तातडीने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले.सुनीता गणपत दिवाळे (वय ७०) असे गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. त्या मुलगा संतोष गणपत दिवाळे (वय ३५) यांच्या समवेत राहतात. संतोष याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे व आईचे नेहमी वाद होत हाेते. संतोष याने रविवारी सायंकाळी बाजारातून कोळंबी आणली होती. आईने ती साफ केल्यानंतर त्यांनी मुलाला ‘तू मसाल्याचे वाटत तयार कर,’ असे सांगितले. याचा मुलाला राग आला आणि त्याने मसाला वाटप करण्याचा वरवंटा आईच्या डोक्यात मारला. त्यानंतर त्याने शर्टाने तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमिनीवर रक्ताचा सडा आणि आई निपचित पडल्याचे पाहून ताे घाबरला.या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगले, उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड, सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र रेवणे, नितेश राणे, महिला पोलिस प्रियांका कांबळे, उर्मिला शेडे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, लांजा प्रभारी निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. पाेलिसांनी तातडीने जखमी वृद्धेला लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तिथून पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.याप्रकरणी संताेष गणपत दिवाळे याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड या करीत आहेत.

घाबरला अन् पाेलिसांकडे धावलासंतोष याला दारूचे व्यसन होते. मात्र, गेले तीन दिवस तो दारू प्यायला नव्हता. रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या आईला पाहून ताे घाबरला. आजूबाजूला वस्ती नसल्याने मदतीला बोलवायचे काेणाला, असा प्रश्न त्याला पडला. त्याने लांजा पोलिस स्थानक गाठले व घडलेल्या घटनेची पोलिसांनी माहिती दिली. त्यामुळे पाेलिस तातडीने घटनास्थळी पाेहाेचले. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धेचा जीव वाचला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Son attacks mother with grinding stone over spice request.

Web Summary : In Ratnagiri, a son assaulted his elderly mother with a grinding stone after she asked him to prepare spices. Critically injured, she was rushed to the hospital. Police arrested the son, preventing a potential fatality.