शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रत्नागिरीच्या सीमा शुल्क विभागाने कोल्हापुरात चौघांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:22 IST

याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दाेघे कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) आणि दाेघे सातारा व लातूरमधील रहिवासी 

रत्नागिरी : कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभाग) रविवारी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई करत बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन मौल्यवान कातडी आणि एक आलिशान कार जप्त केली आहे. याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दाेघे कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) आणि दाेघे सातारा व लातूरमधील रहिवासी आहेत.समीर तातू तेजम व राकेश रमेश बांदेकर (दाेघेही रा. कुडाळ), शेख नसरुद्दीन हबीब (रा. लातूर), विजय विष्णू जमदाडे (रा. सातारा), अशी अटक केलेल्या चाैघांची नावे आहेत. काही व्यक्ती बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती सीमा शुल्क विभागाच्या ‘प्रतिबंधक व गुप्तचर’ शाखेला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत अधीक्षक हिमांशू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने २९ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर महामार्गावर सापळा रचला.दोन वाहनांमधील एक मरून रंगाची ‘किया सेल्टोस’ आणि एक पांढऱ्या रंगाची ‘फोर्ड फिगो’ व्यक्तींकडे बिबट्याची दोन कातडी होती. त्या व्यक्ती पुणे-बंगळुरू महामार्गावरील शिरोली एमआयडीसीजवळ संभाव्य खरेदीदारांची वाट पाहत होत्या.वाहनांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, पांढऱ्या रंगाची ‘फोर्ड फिगो’ गाडी अधिकाऱ्यांचे प्रयत्न धुडकावून लावत वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाली; मात्र त्या गाडीतील एक व्यक्ती बिबट्याची कातडी असलेली एक पिशवी घेऊन तिथेच मागे राहिली. त्याचबराेबर दुसऱ्या गाडीची झडती घेतली असता त्या वाहनातील तीन व्यक्तींना बिबट्याच्या कातड्यासह ताब्यात घेण्यात आले.सीमा शुल्क विभागाने ही कातडी आणि तस्करीसाठी वापरलेली गाडी जप्त केली असून, घटनास्थळावरून काही आक्षेपार्ह कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक उपकरणेही ताब्यात घेतली आहेत.या कारवाईत अटक केलेल्या चाैघांना कोल्हापूरच्या वडगाव न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. चाैघांना ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली आहे.या यशस्वी कारवाईत अधीक्षक लक्ष्मीकांत भातकर, संदीप कौशिक यांच्यासह निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, रितिक कुंभलवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा आणि हवालदार संजय जाधव व अभिषेक यादव यांचा सहभाग होता.

मुद्देमाल वनविभागाकडेचाैघांना कोल्हापूर येथील बिंदू चौक कारागृहात ठेवण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेली बिबट्याची कातडी पुढील तपास आणि आवश्यक त्या कायदेशीर कारवाईसाठी महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाकडे सुपुर्द करावीत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard skin smuggling busted in Kolhapur; four arrested by customs.

Web Summary : Ratnagiri Customs seized leopard skins and arrested four in Kolhapur for illegal trafficking. The operation recovered skins, a car, and documents near Shiroli MIDC. The arrested individuals are from Kudal, Satara and Latur. They are in judicial custody until April 8th, investigation ongoing.