शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेचे अध्यक्षपद डी. पुरंदेश्वरी यांच्याकडे? नरेंद्र मोदी मित्रपक्षांसोबत करणार सल्लामसलत
2
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
3
आजचे राशीभविष्य, ११ जून २०२४ : कुटुंबात एकोपा राहील, आर्थिक नियोजन यशस्वी कराल
4
इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
5
‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव
6
मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद
7
आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’
8
"वर्षभरापूर्वी माझी कारकीर्द संपल्याचे बोलत होते, आता मला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणतात" - जसप्रीत बुमराह
9
मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती
10
भारतात बसून केला विदेशातील मुलीचा छळ, इंटरपोलच्या टीपवरून एकाला अटक
11
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
12
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
13
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
14
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
15
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
16
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
17
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
18
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
19
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
20
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न

शिवशाही बसची रिक्षाला धडक, ठाणे येथील तिघेजण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 2:06 PM

दापाेली : ठाणे - दापाेली शिवशाही बसने रिक्षाला पाठीमागून दिलेल्या धडकेत रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात ...

दापाेली : ठाणे - दापाेली शिवशाही बसने रिक्षाला पाठीमागून दिलेल्या धडकेत रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात मुंबई-गाेवा महामार्गावरील माणगाव (जि. रायगड) येथील मानस हाॅटेलसमाेर रविवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान झाला. या अपघातातील मृत्युमुखी पडलेले तिघेही ठाणे येथील रहिवासी आहेत. दत्तात्रय वरंदेकर, प्रवीण मालुसरे व गणेश बाबू जाधव (सर्व रा. ठाणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.ठाणे-दापाेली ही शिवशाही बस (एमएच ०९, एफएल ०२४६) ठाणेवरून दापाेलीकडे येत हाेती. ही गाडी महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरातील मानस हाॅटेलजवळ आली असता समाेरून जाणाऱ्या रिक्षाला (एमएच ०४, एफसी ६२८२) पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की, शिवशाही बससह रिक्षा रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला तर बस बाजूच्या कठड्यावर गेली हाेती.घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार गणेश समेळ व सानप घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच एस.टी. महामंडळाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले हाेते. अपघातातील मृतांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सुरक्षा रक्षक विवेक नितनवरे, नागेश दीपके यांनी सहकार्य केले. या अपघाताचा पंचनामा माणगाव पाेलिसांनी केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू