ज्येष्ठ उद्योजक टी. जी. शेट्ये यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:12+5:302021-09-24T04:38:12+5:30

रत्नागिरी : नजीकच्या कुवारबाव येथील रहिवाशी, ज्येष्ठ उद्योजक, रूपराज फर्निचरचे मालक टी. जी. ऊर्फ बाळासाहेब शेट्ये यांचे पुणे ...

Senior Entrepreneur T. G. Shetty passed away | ज्येष्ठ उद्योजक टी. जी. शेट्ये यांचे निधन

ज्येष्ठ उद्योजक टी. जी. शेट्ये यांचे निधन

रत्नागिरी : नजीकच्या कुवारबाव येथील रहिवाशी, ज्येष्ठ उद्योजक, रूपराज फर्निचरचे मालक टी. जी. ऊर्फ बाळासाहेब शेट्ये यांचे पुणे येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

त्यांनी सुरुवातीला आपल्या व्यवसायाची सुरुवात सागर इंजिनियरिंगने केली होती. रत्नागिरी नगरपरिषदेवर ते नगरसेवक म्हणूनही काही काळ कार्यरत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अनेक वर्ष संचालक होते, तसेच काँँग्रेसचे कट्टर समर्थक होते. तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले हाेते. श्री राधाकृष्ण वैश्य संस्थेचे ते माजी अध्यक्षही होते.

कुवारबाव येथे मुलगा राजेश यांच्या मदतीने त्यांनी उद्योग उभारला. फर्निचर शोरूमपासून सुरुवात करून कंत्राटदार व बिल्डर व्यवसायात पदार्पण करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक माणसे त्यांनी जोडली होती. त्यांचे सर्व पक्षांशी स्नेहाचे संबंध होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा राजेश, सून, नातवंडे, विवाहित कन्या आदी परिवार आहे.

Web Title: Senior Entrepreneur T. G. Shetty passed away