रत्नागिरीच्या सौम्या मुकादम हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:21 IST2022-12-01T12:21:25+5:302022-12-01T12:21:42+5:30

मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य योगासन अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Selection of Soumya Mukadam from Ratnagiri for the national competition | रत्नागिरीच्या सौम्या मुकादम हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरीच्या सौम्या मुकादम हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य योगासन अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या रत्नागिरीच्या सौम्या देवदत्त मुकादम हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा डिसेंबर महिन्यात मुंबईत होणार आहेत.

नॅशनल योगासन स्पोर्टस् फाउंडेशनतर्फे २७ व २८ नोव्हेंबरला मुंबई येथे महाराष्ट्र राज्य योगासन अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आल्या. पाच गटात झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरीच्या जीजीपीएस गुरुकुलमध्ये सातवीत शिकणाऱ्या सौम्या मुकादम हिने भाग घेतला होता. तिने सब ज्युनियर गर्ल्स या गटात पारंपरिक योगा या प्रकारात सादरीकरण केले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. सौम्याला गुरुकुलच्या योगा शिक्षिका श्रद्धा जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले.

राज्य स्पर्धेचा प्रशस्तीपत्रक वितरण सोहळा कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याहस्ते झाला. यावेळी नॅशनल योगासन स्पोर्टस् फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर गोकर्ण, सरचिटणीस हेमा शहा, खजिनदार सोनाली गोकर्ण, संचालक पल्लवी कव्हाणे उपस्थित होत्या.

Web Title: Selection of Soumya Mukadam from Ratnagiri for the national competition