Ratnagiri: लाखो रुपये ॲडव्हान्स घेऊन खलाशांचा पोबारा, नौकामालक आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:15 IST2025-10-03T16:15:07+5:302025-10-03T16:15:47+5:30

आठ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा पर्ससीननेट मासेमारी सुरू

Seamen's exodus puts shipowners in financial trouble | Ratnagiri: लाखो रुपये ॲडव्हान्स घेऊन खलाशांचा पोबारा, नौकामालक आर्थिक संकटात

संग्रहित छाया

रत्नागिरी : पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन अद्याप महिनाही उलटलेला नाही, तोपर्यंत खलाशांनी आपल्या गावाकडे पलायन केले आहे. दिवसेंदिवस पलायनाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नौकामालकांना मोठा फटका बसल्याने ते आता नव्या संकटात सापडले आहेत. पळून जाणाऱ्या खलाशांमध्ये नेपाळी खलाशांची संख्या अधिक आहे.

पर्ससीन नेटने मासेमारी केल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी त्यासाठी लागणाऱ्या खलाशांसाठी नौकामालकांना पायपीट करावी लागते. त्यासाठी काम करणाऱ्या स्थानिक खलाशांची संख्या कमी पडते. म्हणून नौका मालक कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल वा अन्य राज्यांतून खलाशी आणतात. आता नेपाळी खलाशीही अनेक नौकांवर काम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे खलाशी आणण्यासाठी नौका मालकांना परराज्यात फेऱ्या माराव्या लागतात. अनेकदा हजारो रुपये ॲडव्हान्स दिले जातात. ही रक्कम घेऊनही काही महिने काम करून खलाशी पळून जातात. त्यामुळे नौकामालकांचे आर्थिक नुकसान होते. शिवाय खलाशांची संख्या कमी झाल्याने त्यांना स्वत:ला समुद्रात इतर खलाशांप्रमाणे जावे लागते.

अजून मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच सततच्या वातावरणातील बदलामुळे अनेकदा मासेमारी बंद ठेवावी लागत आहे. तरीही खलाशांच्या जेवणाचा खर्च तसेच त्यांना मासिक पगारासह हप्ताही द्यावा लागतो. हजारोंचा हा खर्च भागवताना नौकामालकांना कसरत करावी लागत आहे.

आठ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा पर्ससीननेट मासेमारी सुरू झालेली आहे. अशा वेळी मालकांना साथ देण्यापेक्षा अनेक खलाशांनी पलायन केल्याचे नौकामालकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नौकामालक अडचणीत आले आहेत. अनेक खलाशांना लाखो रुपये ॲडव्हान्स दिले आहेत. पलायन केलेल्या खलाशांकडून ॲडव्हान्स रक्कम वसूल कशी करायची, असा प्रश्न नौकामालकांना सतावत आहे. नौकामालक संकटात असताना त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

आणखी एक संकट

पर्ससीन नौकेवर २५ ते ३० खलाशी लागतात. जिल्ह्यात खलासी मिळवताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नौकामालकांना अन्य राज्यांमधून खलाशी आणावे लागतात. त्यासाठी खर्चही मोठा असतो. आधीच डिझेल खर्चाइतके मासे मिळत नसल्याने नौकामालक अडचणीत आहेत. त्यात खलाशांच्या पलायनाने मालकांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे.

Web Title : रत्नागिरी: लाखों का एडवांस लेकर नाविक फरार, नाव मालिक आर्थिक संकट में

Web Summary : रत्नागिरी में नाविकों के एडवांस लेकर भाग जाने से नाव मालिक संकट में हैं। नेपाली नाविकों की संख्या अधिक है। मालिकों को नुकसान हो रहा है और खुद समुद्र में काम करना पड़ रहा है। खराब मौसम और कम मछली मिलने से आर्थिक परेशानी बढ़ गई है।

Web Title : Ratnagiri: Sailors Flee with Advances, Boat Owners Face Financial Crisis

Web Summary : Ratnagiri boat owners are in crisis as sailors, often Nepalese, abscond after taking advances. Owners face losses and must work at sea themselves. Poor catches and weather add to their financial woes. They struggle to pay wages amid these desertions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.