Ratnagiri: कशेळी बांध येथील रस्त्यावर पाणी आल्याने सागरी महामार्ग बंद, प्रवाशांचे हाल 

By मनोज मुळ्ये | Updated: July 8, 2024 11:49 IST2024-07-08T11:47:50+5:302024-07-08T11:49:26+5:30

विनोद पवार राजापूर : सागरी महामार्गावरील कशेळी बांध (ता. राजापूर) येथे रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे तेथील वाहतूक ...

Sea highway closed due to water in the road at Kasheli bandh, plight of passengers | Ratnagiri: कशेळी बांध येथील रस्त्यावर पाणी आल्याने सागरी महामार्ग बंद, प्रवाशांचे हाल 

Ratnagiri: कशेळी बांध येथील रस्त्यावर पाणी आल्याने सागरी महामार्ग बंद, प्रवाशांचे हाल 

विनोद पवार

राजापूर : सागरी महामार्गावरील कशेळी बांध (ता. राजापूर) येथे रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

संततधार कोसळणा-या पावसामुळे राजापूर तालुक्यात सर्व भागात पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातील आडिवरेनजीकच्या कशेळी बांध येथे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाणी पुलावरुन वाहू लागले आहे. तेच पाणी पसरुन बराचसा रस्ता त्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

एकीकडे रस्त्यावर आलेले पाणी आणि पावसाची संततार त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासूनच येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एस. टी. वाहतूक बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले.

Web Title: Sea highway closed due to water in the road at Kasheli bandh, plight of passengers