शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

कुडली शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:57 IST

गुहागर तालुक्यातील कुडली येथील १२५ पट असलेल्या पूर्ण प्रथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा नं.१ मधील अपुऱ्या शिक्षकांमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे निवेदन गुहागर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देकुडली शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद?शिक्षक नसल्याने घेतला निर्णय: विद्यार्थी शाळेत न पाठविण्यावर पालक ठाम

गुहागर : तालुक्यातील कुडली येथील १२५ पट असलेल्या पूर्ण प्रथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा नं.१ मधील अपुऱ्या शिक्षकांमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे निवेदन गुहागर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.गुहागर तालुक्यातील कुडली गावातील शाळा नं.१ ही शाळा स्थापनेपासून उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात प्रिसध्द आहे. या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी आज राज्यभरात विविध पदांवर कार्यरत आहेत. आदर्श शाळा पुरस्कार मिवविणार्या १ ते ७ पर्यंत असणाऱ्या या शाळेमध्ये आजच्याघडीला १२५ विद्यार्थी आहेत.

या शाळेच्या पटावर शिक्षक संख्या ६ आहे. मात्र, प्रत्यक्षात येथे चारच शिक्षक कार्यरत आहेत. १ आॅगस्ट २०११ रोजी पदवीधर शिक्षक म्हणून हजर झालेले कारेकर यांच्या अध्यापनाच्या संदर्भात वारंवार असणाऱ्या मुलांच्या, पालकांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या तक्रारीनुसार २५ जुलै २०१६ रोजी त्यांना भातगाव कोसबी शाळेवर प्रकरणी कामगिरीवर काढण्यात आले .

२८ डिसेंबर २०१६ रोजी खेड तालुक्यातून प्रकरणी बदली होऊन मुख्याध्यापक म्हणून हजर झालेले नलावडे यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे व अध्यापनातील त्रुटींमुळे तक्रारींवरुन त्यांनासुध्दा १९ जून २०१८ रोजी पाचेरीआगर नंबर ३ शाळेवर पुन्हा प्रकरणी कामगिरीवर पाठविण्यात आले. यामुळे पटावर जरी शिक्षक ६ दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र, चारच शिक्षक कार्यरत आहेत.या संदर्भात मागील १ वर्षभर शिक्षक मिळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, याबाबत तालुका शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या अपुऱ्या शिक्षकांमुळे शाळेतील १२५ मुलांचे भवितव्य अंधारमय होत असल्याने व्यवस्थापन समिती व पालकांनी चालू शैक्षणिक वर्षाच्या प्ररंभीच शिक्षकांची व्यवस्था न झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतचे लेखी निवेदन गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती, गुहागर यांना देण्यात आले असून ते आता कोणता निर्णय घेतात याकडे ग्रमस्थांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरी