रत्नागिरी : राजापूर येथे दुचाकीला धडक देऊन ठार मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर पत्रकार कायद्यान्वयेही कारवाई करण्यात येणार आहे. या गंभीर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी (९ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, या घटनेला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार असून, त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.हा प्रकार समजल्यानंतर आपण तत्काळ याची माहिती घेतली व पोलिसांनी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. या प्रकरणाची आपण सातत्याने माहिती घेत आहोत. रिफायनरीला पाठिंबा किंवा विरोध हा लोकशाही मार्गाने मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असून तो मांडू शकतो.परंतु, ही घटना अत्यंत वाईट आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित गुन्हेगारावर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई केली. मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांमध्ये हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर यात लागलीच खुनाचा गुन्हा दाखल करताना ३०२ कलम लावण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिलीसंशयित पोलिस कोठडीतून जिल्हा रुग्णालयातपोलिस कोठडीमध्ये असलेला संशयित पंढरीनाथ आंबेरकर याच्या छातीत दुखू लागल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्याला बुधवारी दुपारनंतर जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या बंदोबस्तात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
शशिकांत वारिशे मृत्यू; पत्रकार कायद्यान्वयेही कारवाई करणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 13:56 IST