शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

संजय कदम, वैभव खेडेकर यांना खेड पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:36 AM

शाब्दिक चकमक- काळकाई मंदिर येथे पोलिसांनी पाठलाग करून रॅली काढू नका, असे सांगितले. त्यानंतर माजी आमदार  संजय कदम आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतरही संजय कदम यांनी रॅली सुरूच ठेवली होती.

ठळक मुद्देकारवाई-- विधानसभा निवडणुकीत मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने सहाजणांना आधीच अटक- विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर घडला होता प्रकार- खेडातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार

खेड : विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मनाई आदेशाचे उल्लंघन करून माजी आमदार संजय कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बेकायदेशीर रॅली काढल्याप्रकरणी खेड पोलिसांनी संजय कदम व वैभव खेडेकर यांच्यासह १७ कार्यकर्त्यांना मंगळवारी अटक केली. याप्रकरणी सहाजणांना २२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले की, दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तालुक्यात गस्त सुरू होती. त्याचदरम्याने सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम व वैभव खेडेकर हे २०० ते २५० जणांसोबत दुचाकीवरून कर्णकर्कश हॉर्न वाजवत व ओरडत दापोलीकडून भरणे नाका येथे गेले. त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यांना जिल्हा दंडाधिकारी यांचा मनाई आदेश लागू असल्याचे माहिती असतानाही त्यांनी आदेशाचे उल्लंघन केले. यावेळी त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भरणेनाका येथे रात्री ८.३० वाजता मी व पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की काळकाई मंदिरात रॅलीचा पाठलाग करत गेलो. त्यावेळी रॅली न काढण्याची विनंती केल्याचे पाटील यांनी सांगितले.या घटनेनंतर आम्ही संजय वसंत कदम यासह सायली कदम (रा. चिंचघर - प्रभुवाडी), वैभव खेडेकर (रा. भडगाव), अजय पिंपरे (रा. सुसेरी), तौसिफ सांगले (रा. चिंचघर - प्रभुवाडी), प्रमोद जाधव, धीरज कदम, ओंकार कदम, पंकज जाधव, कौशल चिखले, मिलिंद नांदगावकर, संतोष पवार, स. तु. कदम, सुनील चव्हाण, साहिल कदम, प्रसाद कदम, विनोद तांबे, गोदकर, विजय जाधव, सुरेश मोरे, राहुल कोकाटे, बाबा मुदतसर, प्रकाश शिगवण, बाबू नांदगवकर, सतीश कदम, सचिन जाधव, इम्तियाज खतीब, प्रदोश सावंत, चेतन धामणकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम १४३, १४७, १४९, २६८, २९०, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१चे कलम १२६सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.त्यापैकी अजय पिंपरे, तौसिफ सांगले, प्रमोद जाधव, धीरज कदम, ओमकार कदम, पंकज जाधव या सहाजणांना दि. २२ ऑक्टोबर रोजी अटक केली होती, तर दि. १९ नोव्हेंबर रोजी संजय कदम, सायली कदम, वैभव खेडेकर, साहिल कदम, प्रसाद कदम, विनोद तांबे, ओंकार गोंदकर, विजय जाधव, राहुल कोकाटे, प्रकाश शिगवण, सचिन जाधव, प्रदोष सावंत, चेतन धामणकर, कौशल चिखले, मिलिंद नांदगावकर, संतोष पवार, सुनील चव्हाण आदी एकूण सतरा आरोपींना अटक करण्यात आली  आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.शाब्दिक चकमककाळकाई मंदिर येथे पोलिसांनी पाठलाग करून रॅली काढू नका, असे सांगितले. त्यानंतर माजी आमदार  संजय कदम आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतरही संजय कदम यांनी रॅली सुरूच ठेवली होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी