शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी.च्या २५ गाड्या काढणार भंगारात..

By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST

राज्य परिवहन महामंडळ : एस. टी.चे आयुर्मान १० वर्षे निर्धारित

मेहरून नाकाडे -रत्नागिरी  ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील २५ गाड्या निर्लेखित (भंगारात) काढण्यात येणार आहेत. एस. टी.चे आयुर्मान १० वर्षे निर्धारित करण्यात आले आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ वापरलेल्या एस. टी.च्या १० ते १५ टक्के जुन्या गाड्या बदलण्यात येतात. गतवर्षी एकूण ७४ गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. त्यामुळे १ कोटी ४१ रूपये लिलावातून प्राप्त झाले होते. मार्चपर्यंत २५ गाड्यांचा लिलाव होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी वर्कशॉप १९६० पासून कार्यरत आहे. सुरुवातीला रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभाग संयुक्त असल्याने एकाच वर्कशॉपमधून कामकाज होत असे. मात्र, १९८०मध्ये दोन्ही विभागांची वर्कशॉप स्वतंत्र झाली व कामकाजही स्वतंत्ररित्या सुरू झाले. गिअर बदलणे, इंजिन दुरूस्ती असो वा बदलणे, रंगकाम, आसन व्यवस्था, गाडीतील विद्युतीकरण, टायर बदलणे आदी सर्व प्रकारची कामे वर्कशॉपमध्ये सुरू असतात.याशिवाय वापरात असलेल्या गाड्यांचे दरवर्षी नूतनीकरण करून आरटीओ पासिंग केले जाते. संबंधित वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारची दुरूस्ती होत असल्याने वरिष्ठ अधिकारी ते कारागीरपर्यंत २०० कर्मचारी कार्यरत आहेत.रत्नागिरी विभागात एकूण ७५० गाड्यांव्दारे दररोज ९ हजार फेऱ्यांमधून एकूण २ लाख ५० हजार प्रवाशांची वाहतूक होते. दररोज २ लाख ३३ किलोमीटर इतका प्रवास होतो. त्याद्वारे महामंडळाला ६१ लाख ९ हजार रूपये दररोज सरासरी उत्पन्न मिळत आहे. एकूण ७५० गाड्यांपैकी ६० गाड्या ‘टाटा’ कंपनीच्या, तर उर्वरित ६९० गाड्या ‘लेलँड’ कंपनीच्या आहेत. टाटाच्या ६० पैकी ३२ गाड्या मिडी प्रकारच्या, तर २८ गाड्या साध्या आहेत.विभागातर्फे दरवर्षी जुन्या गाड्यांचा अहवाल पाठवण्यात येतो. शिवाय नवीन गाड्यांची मागणी करण्यात येते. त्यानुसार विभागासाठी नवीन गाड्या पुरवण्यात येतात. नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे नवीन गाड्यांची बांधणी होते. त्यामुळे गाड्यांच्या मागणीनुसार नवीन गाड्या देण्यात येतात. तीन वर्षांच्या वापरानंतर हिरकणी गाड्यांचे साध्या गाडीत रूपांतर करण्यात येते. रंग बदलण्याबरोबरच काही तांत्रिक बदलही करण्यात येतात. टाटा कंपनीच्या गाड्या साडेआठ वर्षे वापरानंतर, तर लेलँड कंपनीच्या गाड्या १० वर्षांनंतर भंगारात काढल्या जातात. गेल्या पाच वर्षांत ३७७ गाड्या भंगारात काढण्यात आल्या असून, त्यांच्या लिलावाद्वारे ३ कोटी ९८ लाख विभागास प्राप्त झाले आहेत.