शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

एस. टी.ची हंगामी भाडेवाढ १ पासून, सर्व गाड्यांचा प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:37 PM

दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून दि. १ ते २० नोव्हेंबर अखेर दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ नोव्हेबरपासून भाडेवाढ आकारली जाणार आहे.

ठळक मुद्देसाधी, मिडी, सलद, निमआराम, रातराणी, शिवशाही वातानुकूलित सर्व गाड्यांचा प्रवास महागवीस दिवसांची हंगामी भाडेवाढ, दिनांक २१पासून तिकीटदर होणार पूर्ववतशिवशाही वातानुकूलित (शयनयान) दरवाढीतून वगळण्यात आली

रत्नागिरी : दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून दि. १ ते २० नोव्हेंबर अखेर दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ नोव्हेबरपासून भाडेवाढ आकारली जाणार आहे.रत्नागिरी विभागाचे महिन्याचे उत्पन्न ३० कोटीच्या घरात आहे. वीस दिवसातील भाडेवाढीमुळे उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ होणार आहे. साध्या, मिडी व जलद गाडीसाठी प्रतिस्टेज ७ रूपये ४५ पैसे दर आकारण्यात येतो. भाडेवाढीनंतर हा दर ८ रूपये २० पैसे होणार आहे.

रातराणी गाडीसाठी प्रतिस्टेज ८ रूपये ८० पैसे दर आहे तो ९ रूपये ७० पैसे होणार आहे. निमआराम गाडीसाठी प्रतिस्टेज १० रूपये १० पैसे दर आहे तो ११ रूपये १० पैसे होणार आहे. वातानुकूलित बससाठी ८ रूपये ६० पैसे असलेला दर ९ रूपये ९० पैसे होणार आहे.

वातानुकूलित शिवशाही (आसनी) १० रूपये ५५ पैसे ऐवजी ११ रूपये ६० रूपये होणार आहे. वातानुकूलित शिवशाही (शयनी) साठी प्रतिस्टेज १५ रूपये २० पैसे दर आहे. मात्र दरवाढ न केल्याने तेच दर राहणार आहेत.इंधनाच्या दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाकडून वारंवार तिकीट दरात वाढ केली जात नाही. दिवाळीच्या सुट्टीत सहल व पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. तोटा भरून काढण्यासाठी गतवर्षी हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती.

दिवाळी सणातील सलग चौथ्या वर्षी वाढ केली जाणार आहे. महामंडळाने १ ते २० नोव्हेंबर अखेर हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीचा हंगाम संपल्यानंतर २० च्या मध्यरात्री पासून पुन्हा मूळ प्रतिटप्पा दराने भाडे पूर्ववत करण्यात येणार आहे.एसटीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये पासधारकांची संख्याही लक्षणीय आहे. मासिक, त्रैमासिक पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हंगामी तिकीटवाढ लागू केली जाणार नाही. मूळ रकमेच्या प्रवासातूनच प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक प्रवास करु शकतात. केवळ रोखीने किंवा तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना हंगामी तिकीटवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे पासधारकांना दिलासा मिळाला आहे.राज्य परिवहन महामंडळाने हंगामी तिकीट दरवाढ एकाचवेळी राज्यात जाहीर केली आहे. सर्वत्र दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंमलबजावणी देखील एकाच दिवसापासून सुरू होणार आहे. वीस दिवसाच्या हंगामी भाडेवाढीनंतर पुन्हा पूर्ववत दर ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे दि.२१ नोव्हेंबरपासून जुने तिकीटदर होणार आहेत.हंगामी भाडेवाढीचे चौथे वर्षराज्य मार्ग परिवहन महामंडळाला लवचिक भाडेवाढीबरोबरच कमी करण्याचाही अधिकार आहे. इंधनाच्या दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले असले तरी दरवर्षी दिवाळीत हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी दिवाळीतील हंगामी तिकीटवाढीचे चौथे वर्ष आहे. महामंडळाने २०१५ मध्ये दिवाळीच्या सु्टीत पहिल्यांदा हंगामी भाडेवाढ केली होती. त्यानंतर २२ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर (२०१६) पर्यंत चार टप्प्यात भाडेवाढ लागू केली होती. गतवर्षी दि. १४ ते ३१ आॅक्टोबर (२०१७) अखेर भाडेवाढ केली होती.भाडेवाढीवर मर्यादा२२ आॅगस्ट २०१४ रोजी नियमित भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६ च्या मध्यरात्रीपासून सुरू झाली. या योजनेतंर्गत प्रत्येक तिकिटधारी प्रवाशाकडून एक रुपया शुल्क आकारले जाते. यावर्षी दि.१५ जून २०१८च्या मध्यरात्री १८ टक्के भाडे वाढ करण्यात आली.दहा टक्के भाडेवाढयावर्षी दिवाळीतील हंगामी भाडेवाढ करताना सर्वप्रकारच्या एस. टी. गाड्यांतील प्रवासाचे तिकीटदर दहा टक्क्याने वाढविण्यात आले आहेत. प्रतिस्टेज तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी