शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

प्रदूषण टाळण्यासाठी एस. टी. महामंडळ आणणार युरो ६ व्हर्जनच्या गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:28 PM

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या युरो ४ या व्हर्जनच्या गाड्या आहेत. या गाड्यांमुळे बीएस व्हर्जनच्या गाड्यांपेक्षा प्रदूषण कमी होत असले तरीही होणारे प्रदूषण हे आरोग्यासाठी धोकादायकच आहे. रत्नागिरी विभागात सध्या युरो ४ व्हर्जनच्या ८५२ गाड्यांचा ताफा असून, या गाड्या धूर ओकत असतात.

ठळक मुद्देप्रदूषण टाळण्यासाठी एस. टी. महामंडळ आणणार युरो ६ व्हर्जनच्या गाड्या रत्नागिरी विभागात युरो-४ व्हर्जनच्या ८५२ गाड्यांचा ताफा

मेहरून नाकाडेरत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या युरो ४ या व्हर्जनच्या गाड्या आहेत. या गाड्यांमुळे बीएस व्हर्जनच्या गाड्यांपेक्षा प्रदूषण कमी होत असले तरीही होणारे प्रदूषण हे आरोग्यासाठी धोकादायकच आहे. रत्नागिरी विभागात सध्या युरो ४ व्हर्जनच्या ८५२ गाड्यांचा ताफा असून, या गाड्या धूर ओकत असतात.दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांचे तसेच पादचाऱ्यांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या हितार्थ महामंडळाने एप्रिल २०२०पासून युरो ६ व्हर्जनच्या गाड्या आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी अजून दोन वर्ष वाट पाहावी लागणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातून ग्रामीण, लांबपल्याच्या गाड्या तसेच शहरी बसेस सोडण्यात येतात. तसेच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दुचाकीस्वारांनाही बरेचदा पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा मिळत नाही. परिणामी गर्दीतून मार्ग काढत जात असताना किमान दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास हा धूर सोसतच करावा लागतो.राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या किमान ८ वर्ष व १२ लाख किलोमीटर धावलेल्या गाड्या रस्त्यावर सोडण्यात येत नव्हत्या. या गाड्या भंगारात काढण्यात येत असत. मात्र, ही मुदत वाढवून १० वर्ष व १२ लाख किलोमीटर करण्यात आली आहे. परंतु, दरवर्षी हे निकष बदलतच असतात.

युरो ४ व्हर्जननुसार एस. टी.चे आयुर्मान ८ ते ९ वर्षे धरले तरी पाच लाख १५ हजार किलोमीटर प्रवास केलेल्या एस. टी.च्या गाड्यातून धूर अधिक निघतो, त्यामुळे अधिक प्रदूषण होेते. रत्नागिरी विभागात ५० हजार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या १६३ गाड्या असून, साडेपाच लाख ते १० लाख किलोमीटर धावलेल्या ५२० तर दहा लाखपेक्षा अधिक किलोमीटर धावलेल्या ६९ गाड्या आहेत.फुफ्फुस व त्वचेसाठी धोकादायकगर्दीच्या ठिकाणी धूर ओकत धावणाऱ्या एस. टी.मुळे श्वसनाचे आजार, त्वचेचे विकार होण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शहरात धावणाऱ्या या गाड्यांची क्षमता चढ चढण्याचीही नसते. तरीही बसचालक ही गाडी पूर्ण ताकदीनिशी चालवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या गाड्या चढावरून जात असताना काळा धूर सोडतात. यावेळी कार्बन मोनोक्साईड आणि कार्बन डायआॅक्साईड हे दोन गॅस बाहेर पडतात. ते फुफ्फुस व त्वचेसाठी धोकादायक आहेत.कार्बन मोनोक्साईड हानीकारकएस. टी.तून उत्सर्जित होणारा धूर मोठ्या प्रमाणावर कार्बन मोनोक्साईड आणि कार्बन डायआॅक्साईड सोडतो. यातील कार्बन मोनोक्साईड हा शरीरासाठी हानीकारक असून, हा गॅस फुफ्फुसात गेल्यामुळे श्वासनलिका आकुंचन पावते व श्वसनाचा त्रास होतो. या गॅसमुळे त्वचेवरही परिणाम होतो.प्रदूषण कमी करणाऱ्या एकूण १६३ एस्. टी.च्या गाड्या५० हजार ते एक लाख किलोमीटर धावलेल्या २६, दीड लाख ते दोन लाख प्रवास केलेल्या ७, दोन ते अडीच लाख किलोमीटर धावलेल्या २०, अडीच ते तीन लाख किलोमीटर धावलेल्या १४, तीन ते साडेतीन लाख किलोमीटर धावलेल्या २१, साडेतीन ते चार लाख किलोमीटर धावलेल्या ३०, चार ते साडेचार लाख किलोमीटर धावलेल्या १९, साडेचार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या २६ मिळून प्रदूषण कमी करणाऱ्या एकूण १६३ एस. टी.च्या गाड्या रत्नागिरी विभागाच्या सद्यस्थितीत ताफ्यात आहेत. 

प्रदूषण होणारच नाहीप्रदूषण कमी करण्यासाठी एप्रिल २०१७पासून भारतात वाहनांसाठी युरो ४ या व्हर्जनचा वापर सुरू झाला. परंतु, यापुढे प्रदूषण होणारच नाही यासाठी युरो ६ हे व्हर्जन आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. एप्रिल २०२० पासून या व्हर्जनची वाहने भारतातील रस्त्यांवरून धावणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच युरो ६ व्हर्जनचा एप्रिल २०२०पासून अवलंब केला जाणार आहे.- विजय दिवटे, यंत्रचालन अभियंता, विभागीय कार्यशाळा

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरीBus Driverबसचालक