शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नाणारबाबत स्थानिकांची भूमिका तीच आमची : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:27 IST

sunil tatkare Ratnagiri- रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांची जी भूमिका आहे, तीच आमची राहील. प्रकल्प यावेत, रोजगार मिळावेत, या जनतेच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांच्या विरोधामुळेच राज्य सरकारला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु, प्रकल्प व्हावा, अशी इच्छा असणारे लोक जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करू इच्छित असतील तर आपण त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न जरूर करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देनाणारबाबत स्थानिकांची भूमिका तीच आमची : सुनील तटकरेशरद पवार यांच्याशी भेट घडवून देऊ

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांची जी भूमिका आहे, तीच आमची राहील. प्रकल्प यावेत, रोजगार मिळावेत, या जनतेच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांच्या विरोधामुळेच राज्य सरकारला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु, प्रकल्प व्हावा, अशी इच्छा असणारे लोक जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करू इच्छित असतील तर आपण त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न जरूर करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समिती सभेसाठी रत्नागिरीत आले असताना खासदार तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोविड काळात भारत सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.

निसर्ग वादळामुळे झालेल्या वित्त हानीत महाविकास आघाडी सरकारने आर्थिक मदत दिली. पायाभूत सुविधेसाठी निधी उपलब्ध करून दिला. सागरी महामार्गासाठी निधी मंजूर असून, ग्रीनफिल्ड महामार्गासाठीही प्रयत्न सुरू आहेत. रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे, असे ते म्हणाले.हर्णै, श्रीवर्धन, आगरदंडा येथील बंदर विकासासाठी ६५० कोटींचा प्रस्ताव असून, लवकरच याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. सागरमाला योजनेंतर्गत त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, सागरी जल वाहतूक वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी अत्याधुनिक पध्दतीने जेटी बांधण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.शेतकऱ्यांचे गेले ६० दिवस शांततेत आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या प्रकाराचे समथन करत नाही, परंतु, पोलिसांनी सत्य शोधून आंदोलनाबाबत गांभीर्य बाळगावे, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे, मात्र तीनही पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपापसात समन्वय साधावा, असेही त्यांनी सूचित केले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पRatnagiriरत्नागिरी