शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंदमार्गे तुरळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ...

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंदमार्गे तुरळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई - गोवा महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग खड्डेमय झाल्याने जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

धरणे आंदोलन

रत्नागिरी : अनुसूचित जाती, जमातीच्या पदोन्नत्तीमधील आरक्षणामध्ये राज्य सरकारने घेतलेली भूमिका व त्यासोबतच इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक कुचकामी भूमिका घेत आहे. याचा निषेध नाेंदविण्यासाठी बहुजन समाज पक्षातर्फे जिल्हा मुख्यालयावर दि. १३ जुलै रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे.

लसीकरणाची मागणी

खेड : तालुक्यातील वेरळ जांबुर्डे गावातील रहिवाशांना कोरोना प्रतिबंधात्मक लस अत्यल्प प्रमाणात देण्यात येत आहे. त्यामुळे कित्येक ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित राहत आहेत. जांबुर्डे क्षेत्रात ३,६२८ लोकसंख्या आहे, अद्याप ७५ जणांनाच लस देण्यात आली आहे.

अन्नधान्य वाटप

चिपळूण : डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे सेवा सप्ताह सुरू आहे. तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या नेतृत्वाखाली रामपूर जिल्हा परिषद गटात गरजू व्यक्तींना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले.

औषधी वनस्पती लागवड

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. औषधी वनस्पतींची ओळख व्हावी, मानवी जीवनातील त्यांचे मूल्य समजावे, या हेतूने महाविद्यालय परिसरात दरवर्षी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येते.

रस्ता दुरुस्तीची मागणी

राजापूर : शहरातील कोंढेतड येथील महामार्गापासून ते मच्छीमार्केट पुलापर्यंतच्या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजिम जैतापकर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वानंद ढेकळे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

संजय चव्हाण यांची निवड

चिपळूण : चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त चिवेली आदर्श विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संजय तुकाराम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी बोरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर भीमराव गलांडे यांची निवड करण्यात आली आहे. ऑनलाईन सभेत ही नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.

स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप

दापोली : तालुक्यातील शिरखल चिंचाळी येथील मारूती मंदिरात पालगड प्रभागातील ७४८ विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची सोय म्हणून कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान महाराष्ट्र कल्याणचे संस्थापक अध्यक्ष संजयराव मोरे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी ७४८ स्वाध्याय पुस्तिका वितरीत करण्यात आल्या.

प्रशासक नियुक्ती

रत्नागिरी : राज्य निवडणूक आयोगाकडून अद्यापही नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न झाल्याने जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या नगर परिषदा व दापोली नगर पंचायतीवर मुदतीनंतर प्रशासकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मंडणगड नगर पंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोकाट जनावरांचा उपद्रव

रत्नागिरी : शहरालगतच्या परटवणे ते शिरगाव मार्गावर मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यामध्ये कळपाने जनावरे हिंडत असतात. शिवाय रात्रीच्यावेळी रस्त्यातच ठाण मांडून बसलेली असतात. सकाळी रस्त्यावर शेणाचा सडा पडलेला असल्याने दुर्गंधी वाढत आहे. गांजुर्डे ते शिरगावपर्यंत ही मोकाट जनावरे हिंडत असून, वाहनचालकांनाही त्यांचा कमालीचा त्रास होत आहे.