म्हाप्रळ येथे महसूल विभागाने सक्शन पंप बुडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 14:18 IST2021-05-06T14:17:40+5:302021-05-06T14:18:52+5:30
Crime Ratnagiri : मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील खाडीत सक्शन पंप असल्याची माहिती मिळताच मंडणगडच्या महसूल विभागाने हा पंप पाण्यात बुडवून टाकला.

म्हाप्रळ येथे महसूल विभागाने सक्शन पंप बुडविला
ठळक मुद्देम्हाप्रळ येथे महसूल विभागाने सक्शन पंप बुडविलाखाजनामधे दोन सक्शन पंप बंद अवस्थेत
मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ येथील खाडीत सक्शन पंप असल्याची माहिती मिळताच मंडणगडच्या महसूल विभागाने हा पंप पाण्यात बुडवून टाकला.
तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, मंडणगड व देव्हारेचे सर्कल प्रवीण मोरे, सर्कल गजानन खामकर, तलाठी प्रवीण आदक, शरद पाटील, कोतवाल स्वप्नील पवार यांच्या टिमने वेसवी परिसरातून खाडीमार्ग गस्त सुरू केली आहे.
यावेळी गोठे पणदेरी परिसरातून पाहणी करत म्हाप्रळ येथे आले असता खाजनामधे दोन सक्शन पंप बंद अवस्थेत दिसले. ते दोनही सक्शन पाण्यात बुडवून कारवाई करण्यात आली. हे पंप कोणाचे होते हे मात्र समजू शकले नाही.