Video : गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील जोडप्याला जीवरक्षकांनी वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 15:45 IST2018-11-14T15:11:56+5:302018-11-14T15:45:45+5:30
पुण्याहून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेले एक जोडपे समुद्रात बुडत असताना जीवरक्षकांनी वाचवले. ही घटना बुधवारी (14 नोव्हेंबर) सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली.

Video : गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील जोडप्याला जीवरक्षकांनी वाचवले
गणपतीपुळे (रत्नागिरी) - पुण्याहून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेले एक जोडपे समुद्रात बुडत असताना जीवरक्षकांनी वाचवले. ही घटना बुधवारी (14 नोव्हेंबर) सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश आणि सपना मेदनकर असे जोडप्याचे नाव आहे.
पुण्याच्या खेड तालुक्यातील चाकण येथील गणेश रघुनाथ मेदनकर (39) आणि त्यांची पत्नी सपना (35) आज फिरण्यासाठी गणपतीपुळे येथे दाखल झाले. ते पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. किनाऱ्यावर असलेले जीवरक्षक अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर, आशिष माने, मिलिंद माने, अक्षय माने, ओंकार गावणकर तसेच वॉटर स्पोर्टस्च्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवले.