शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लांजा तहसीलच्या धोकादायक छताची दुरुस्ती

By admin | Updated: July 3, 2016 23:43 IST

बांधकाम विभागाकडून काम : जिल्हाधिकाऱ्यांनी वृत्ताची दखल घेत दुरूस्तीचे तहसीलदारांना दिले आदेश

 लांजा : लांजा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या छताचा स्लॅब कोसळत असल्याने कर्मचारीवर्ग व नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने ढासळत असलेल्या छताची दुरुस्तीचे काम करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळी लांजा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील छताचा काही भाग कोसळला तर इतर भाग ढासळत असल्याने तालुक्यातून कामानिमित्ताने येणारे लोक व कार्यालयातील कर्मचारी जीव मुठीत घेऊन वावर करत होते. स्लॅब कोसळल्यानंतर या ठिकाणी बाकडे लावून प्रवेश बंद करण्यात आला होता. ‘लोकमत’मधून या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली व तहसीलदारांना ताबडतोब काम करुन घेण्याचे आदेश दिले. तहसीलदार मारुती कांबळे यांनी बांधकाम विभागाला तत्काळ काम करण्याचे संकेत दिल्यानंतर शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी छताची डागडुजी करण्यास तातडीने सुरुवात केली आहे. ‘लोकमत’ ने या धोकादायक भागाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानेच तातडीने या भागाची दुरूस्ती करण्यात येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच ‘लोकमत’ चे आभारही मानले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणाऱ्या शासकीय इमारती नादुरुस्त असताना याकामी संबंधित खाते दुर्लक्ष करत असल्याने शासकीय कर्मचारीवर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुम, लांजा पोलीस स्थानकची इमारत आदींची दुरुस्ती होणे गरजेचे असताना दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)