रेफ्रिजरेशन तंत्रज्ञांना अत्यावश्यक सेवेत सामावून घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:57+5:302021-04-24T04:31:57+5:30

रत्नागिरी : रेफ्रिजरेशन तंत्रज्ञांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेत वातानुकूलित संबंधी अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी, या व्यावसायिकांना ...

Refrigeration technicians should be accommodated in essential services | रेफ्रिजरेशन तंत्रज्ञांना अत्यावश्यक सेवेत सामावून घ्यावे

रेफ्रिजरेशन तंत्रज्ञांना अत्यावश्यक सेवेत सामावून घ्यावे

रत्नागिरी : रेफ्रिजरेशन तंत्रज्ञांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेत वातानुकूलित संबंधी अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी, या व्यावसायिकांना परवानगी यावी, अशी मागणी रत्नागिरी रेफ्रिजरेशन टेक्निशियन असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर वासावे यांनी केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयात दाखल होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने त्या रुग्णालयातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व त्यासंबंधी आवश्यक घटकांकडे, सेवेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

विरारमधील वल्लभ कोविड रुग्णालयात एसीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयासाठी आवश्यक एजन्सी यामध्ये वातानुकूलित यंत्र नियंत्रित करणाऱ्या तंत्रज्ञानांचा अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णालय एअर कंडिशनर, वातानुकूलित रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवेत समावेश केला असता तर छोट्याशा चुकीमुळे १३ निरपराधांचा बळी गेला नसता. रत्नागिरी जिल्हा रेफ्रिजरेशन टेक्निशियन असोसिएशनकडून घटनेचा निषेध करण्यात आला आहे. शिवाय यासंबंधी शासकीय स्तरावर विचारविनिमय होऊन रेफ्रिजरेशन तंत्रज्ञांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेत वातानुकूलित संबंधी अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी या व्यावसायिकांना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Refrigeration technicians should be accommodated in essential services