रत्नागिरीत तलवारधारी तरूणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:31 IST2018-10-24T15:29:56+5:302018-10-24T15:31:25+5:30
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार ते प्रमोद महाजन मैदानादरम्यान हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या पुण्याच्या तरूणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने रात्री ताब्यात घेतले. राहुल दिगंबर गायकवाड (२४) असे त्याचे नाव आहे. मात्र तो तलवार घेऊन नेमका कशासाठी रत्नागिरीत आला होता? तो कोणाचा शोध घेत होता, हे अजून उलगडलेले नाही.

रत्नागिरीत तलवारधारी तरूणाला अटक
रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार ते प्रमोद महाजन मैदानादरम्यान हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या पुण्याच्या तरूणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने रात्री ताब्यात घेतले. राहुल दिगंबर गायकवाड (२४) असे त्याचे नाव आहे. मात्र तो तलवार घेऊन नेमका कशासाठी रत्नागिरीत आला होता? तो कोणाचा शोध घेत होता, हे अजून उलगडलेले नाही.
एक तरुण हाताता तलवार घेऊन शहरातील आठवडा बाजार ते प्रमोद महाजन मैदानादरम्यान फिरत असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे कर्मचारी महेश पाटील, गणेश सावंत यांना त्यांच्या खास खबऱ्याकडून मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यासह तत्काळ घटनास्थळी जात त्याला तलवारीसह ताब्यात घेतले.
त्यांनी त्याला विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तो कोणाचातरी घातपात करण्यासाठी तलवार घेऊन फिरत असल्याचा संशय बळावला आहे.
राहुल हा मुळचा पुणे येथील आहे. तो तलवार घेऊन का फिरत होता, हे अध्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरानजीक उबेद होडेकर यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले होते. यातील संशयित आरोपींचे अटकसत्र सुरु असतानाच राहुल शहरात तलवार घेऊन फिरत असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. राहुल त्याच प्रकरणाशी संबंधित आहे का, याचाही तपास केला जात आहे.