शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

रत्नागिरी : संगमेश्वरनजीक एसटीला अपघात, २५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 11:46 IST

संगमेश्वर तालुक्यातील नायरी - निवळी घाटात एसटी बसचा गाडीवरील ताबा सुटून गाडी तीन पलट्या मारून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजण्याच्यादरम्याने घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य २५ प्रवासी या अपघातामध्ये जखमी आहेत. धुक्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देसंगमेश्वरनजीक एसटीला अपघातएक महिला गंभीर जखमी

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नायरी - निवळी घाटात एसटी बसचा गाडीवरील ताबा सुटून गाडी तीन पलट्या मारून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजण्याच्यादरम्याने घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य २५ प्रवासी या अपघातामध्ये जखमी आहेत. धुक्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

निवळी - संगमेश्वर (एमएच १४, बीटी २४३२) ही वस्तीची एसटी बस चालक किरण सुतार (रा. इस्लामपूर) हे निवळीहून संगमेश्वरकडे घेऊन जात होते. या गाडीत वाहक मनोहर शिवराम भिड (रा. संगमेश्वर)हे होते. सकाळी ५.४५ वाजण्याच्या दरम्याने गाडीवरील ताबा सुटल्याने नायरी निवळी घाटात एसटी बसने तीन पलट्या मारल्या.या गाडीतून शाळेचे विद्यार्थीदेखील प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रवाशांना घाटातून बाहेर काढण्यासाठी धाव घेतली आहे. अद्याप प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी