शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

रत्नागिरी :पारंपरिक-पर्ससीनमधील वाद यंदाही चिघळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 16:25 IST

पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी २४ आॅगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे राज्याच्या मत्स्य आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद यंदाही चिघळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपारंपरिक-पर्ससीनमधील वाद यंदाही चिघळणार ?मच्छीमार आक्रमक : १ सप्टेंबरपासून पर्ससीनला सुरुवात

रत्नागिरी : पावसाळ्यानंतर सर्वप्रथम पारंपरिक मासेमारीला १ आॅगस्टपासून सुरूवात झाली. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नौकांकडून सागरी मासेमारीला सुरूवात होणार आहे. मात्र, पर्ससीन नौकांची घुसखोरी रोखावी व बेकायदा मासेमारी करणाऱ्या जिल्ह्यातील शेकडो नौकांवर बंदरांमध्येच कडक कारवाई करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी २४ आॅगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे राज्याच्या मत्स्य आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद यंदाही चिघळण्याची शक्यता आहे.१ आॅगस्टपासून पारंपरिक मासेमारी सुरू झाली. मात्र, पावसाचा व तुफानी वाऱ्याचा दणका बसल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारीला सुरूवात होणार असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही मासेमारी शासकीय आदेशानुसार सुरू राहणार आहे.दि. ५ फेब्रुवारी २०१६च्या शासन आदेशानुसार १ सप्टेंबर ते ३१ जानेवारी या चार महिन्यांमध्येच पर्ससीन मासेमारीला परवानगी आहे. त्यामुळे पर्ससीन नौकांकडून पारंपरिकच्या सागरी क्षेत्रात होणारी घुसखोरी व परवाना नसलेल्या शेकडो नौकांकडून होणारी बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी कडक कारवाईचे आदेश राज्याच्या मत्स्य आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यातील यंत्रणेला दिले आहेत.

त्यानुसार विनापरवाना मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांना बंदरातच कारवाई करून रोखून धरले जाणार आहे. त्याचबरोबर २५ मिलिमीटरपेक्षा कमी आस असलेली पर्ससीन जाळी वापरणाऱ्या नौकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.जिल्ह्यात परवानाधारक पर्ससीन नौका २७२, तर परवानाधारक पारंपरिक मच्छीमारी नौका ३५० आहेत. परंतु या अधिकृत नौकांव्यतिरिक्त बेकायदा मासेमारी करणाऱ्या ५००पेक्षा अधिक नौका जिल्ह्याच्या सागरी हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा मासेमारी करीत आहेत. त्यातील ३५० नौका या मोठ्या आहेत.

त्यामुळे बेकायदा नौकांवर कारवाईची मागणी पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी शासनाकडे केली आहे. अशा नौकांना शासन आदेशानुसार यावेळी मत्स्य अधिकाऱ्यांनी बंदरांमध्येच रोखून कारवाई करण्याची मानसिकता दाखवावी. त्यांना अभय मिळाल्यास पारंपरिक मच्छीमार तीव्र आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष खलील वस्ता यांनी दिला आहे.जिल्ह्यात परवानाधारक पर्ससीन नौका २७२रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन मासेमारी करणाऱ्या परवानाधारक २७२ बोटी आहेत. त्यामध्ये २६० मोठ्या नौका, तर १२ मिनी पर्ससीन नौकांचा समावेश आहे. पारंपरिक अर्थात शाश्वत मासेमारी करणाऱ्या नौकांची जिल्ह्यातील संख्या ३५० असून, त्यातील २५० नौका या विनाइंजिनच्या आहेत. या सर्व अधिकृत नौकांना शासनाने ठरवून दिलेल्या सागरी हद्दीमध्येच मासेमारी करता येणार आहे.शासनाचे नियम, निर्बंध

  1. राष्ट्रीय  सहकार विकास निगम (एनसीडीसी) योजनेतून उभारलेल्या नौकांना पर्ससीन जाळ्याने मासेमारी करण्यास बंदी आहे.
  2. राज्यातील ४९४ पर्ससीन परवानाधारक नौकांना झाई ते मुरूड सागरी भागात पर्ससीन मासेमारीस १२ महिने बंदी राहणार आहे.
  3. सर्व परवानाधारक पर्ससीन नौकांनी मुरूड ते बुरोंडी १० मीटर, बुरोंडी ते जयगड २० मीटर, जयगड ते बांदा २५ मीटर खोल असलेल्या पाण्यातच मासेमारी करावयाची आहे.
  4. परवानाधारक पर्ससीन मच्छीमारी नौकांनी २५ मिलिमीटरपेक्षा कमी आस असलेल्या पर्ससीन जाळ्यांनी मासेमारी करू नये.
  5. हैड्रॉलिक विंच (बूम)च्या सहाय्याने भूल देऊन, रसायनांचा वापर करून तसेच एलईडी लाईटचा वापर करून मासे पकडण्यास बंदी आहे.
टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी