रत्नागिरी पोलिसांनी घडवून आणली तेलंगणातील वृद्धाची कुटुंबियांशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 17:53 IST2021-03-22T17:19:41+5:302021-03-22T17:53:19+5:30

Police Ratnagiri-मनोरुग्ण असलेल्या व तेलंगणातून गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे बेवारसरीत्या फिरत असलेल्या एका वृद्धाची त्याच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणण्याचे काम रत्नागिरीतील पोलिसांनी केली आहे. हरवलेल्या वृद्धाला अनेक महिन्यांनी पाहिल्यानंतर कुटुंबियांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले होते.

Ratnagiri police arranged for a Telangana old man to meet his family | रत्नागिरी पोलिसांनी घडवून आणली तेलंगणातील वृद्धाची कुटुंबियांशी भेट

रत्नागिरी पोलिसांनी घडवून आणली तेलंगणातील वृद्धाची कुटुंबियांशी भेट

ठळक मुद्देरत्नागिरी पोलिसांनी घडवून आणली तेलंगणातील वृद्धाची कुटुंबियांशी भेटअनेक महिन्यांनी पाहिल्यानंतर कुटुंबियांच्याही चेहऱ्यावर उमटले हसू

रत्नागिरी : मनोरुग्ण असलेल्या व तेलंगणातून गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे बेवारसरीत्या फिरत असलेल्या एका वृद्धाची त्याच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणण्याचे काम रत्नागिरीतीलपोलिसांनी केली आहे. हरवलेल्या वृद्धाला अनेक महिन्यांनी पाहिल्यानंतर कुटुंबियांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले होते.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजापीपीएल कंपनीजवळील बसस्टॉपच्या शेडमध्ये राहणाऱ्या वैकन्ना वीरय्या वरीकोपल्ला (वय ५८, रा. ग्राम आक्रोम जि. नालगोंडा रा. तेलंगणा) असे त्या वृध्दाचे नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते विमनस्य अवस्थेत कंपनीजवळील शेडमध्ये राहत असल्याचे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.

वैकन्नाला फक्त तेलगू भाषा येत असून, कंपनीत तेलगू भाषा येणाऱ्या स्टाफने त्याची चौकशी करुन याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्या वृध्दाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी तेलंगणा राज्यातील पोलिसांशी संपर्क साधला.

दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधून वैकन्ना यांना गुहागरहून रत्नागिरीत आणण्यास सांगितले. वैकन्ना यांना मनोरुग्ण असल्याचे लक्षात येताच त्यांना प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. याच कालावधीत मोबाईलवर नातेवाईकांशी संपर्क करुन प्रौढाची ओळख पटल्यावर त्यांचे नातेवाईक रत्नागिरीमध्ये आले व ते त्यांना हैदराबादला घेऊन गेले.

वैकन्ना यांच्या मुलींना मराठी किंवा हिंदी भाषा येत नव्हती. त्यांना फक्त तेलगू भाषा येत होती. परंतू त्यांच्या चेहऱ्यावरुन रत्नागिरी पोलिसांबाबत असलेले कृतज्ञतेचे भाव ओळखून येत होते. वैकना यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार शांताराम झोरे व नितीन डोमणे यांनी सहभाग घेतला होता. तसेच राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी 

Web Title: Ratnagiri police arranged for a Telangana old man to meet his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.